कमल हासन यांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणे पाकव्याप्त काश्मीर म्हणजे स्वतंत्र काश्मीर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 11:39 AM2019-02-18T11:39:55+5:302019-02-18T11:40:21+5:30

कमल हासन यांनी एका मुलाखतीमध्ये केंद्राच्या काश्मीरबाबतच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच सरकार काश्मीरमध्ये जनमत घेण्यासाठी का घाबरत आहे, असाही सवाल उपस्थित केला आहे.

Kamal Haasan's controversial statement; It is said that PoK is independent Kashmir | कमल हासन यांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणे पाकव्याप्त काश्मीर म्हणजे स्वतंत्र काश्मीर

कमल हासन यांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणे पाकव्याप्त काश्मीर म्हणजे स्वतंत्र काश्मीर

googlenewsNext

चेन्नई : प्रसिद्ध अभिनेता कमल हासन यांनी राजकारणातही प्रवेश केला आहे. मात्र, यानंतर ते बऱ्याचदा वादात सापडले आहेत. सीआरपीएफच्या जवानांवर पुलवामामध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर कमल हासन यांनी एका मुलाखतीमध्ये पाकव्याप्त काश्मीरला 'स्वतंत्र काश्मीर' म्हटले आहे. तसेच काश्मीरमध्ये जनमत चाचणी घेण्यात यावी, असेही म्हटले आहे. यामुळे नवीन वाद ओढवण्याची शक्यता आहे. 

कमल हासन यांनी एका मुलाखतीमध्ये केंद्राच्या काश्मीरबाबतच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच सरकार काश्मीरमध्ये जनमत घेण्यासाठी का घाबरत आहे, असाही सवाल उपस्थित केला आहे. जनमत घेतल्यास काश्मीरी नागरिक भारतासोबत येऊ इच्छित असतील, पाकिस्तानमध्ये जाऊ इच्छित असतील किंवा स्वतंत्र देश म्हणून राहू इच्छित असतील, तर ते समजेल. जनमत घेण्याचा मुद्दा अनेक संघटना उठवत आहेत. जर भारत स्वत:ला एक चांगला देश म्हणवत असेल तर अशा प्रकारची वागणूक देता कामा नये, असेही हासन यांनी म्हटले आहे. 




हासन यांना पुलवामामध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. यामध्ये 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. 
चेन्नईमध्ये आयोजित एका सभेमध्ये हासन यांनी म्हटले की, काश्मीरमध्ये जवान मरण्यासाठी येतात असे कोणी बोलले की आपल्याला वेदना होतात. भारतीय सेनाही जुन्या फॅशनसारखी झालीय. ज्याप्रकारे जग बदलत आहे, आपण कसे ठरवू शकतो की माणूस खाण्यासाठी दुसऱ्या माणसाला मारू शकत नाही. युद्ध, वाद संपवण्याचीही एक वेळ येईल. मानवतेने गेल्या 10 वर्षात काही शिकवले नाही का.

 



पुढे या दाक्षिणात्य अभिनेत्याने म्हटले आहे की, जेव्हा मी मॅगझीन चालवत होतो, तेव्हा काश्मीरच्या मुद्द्यावर खूप काही लिहीले होते. आज मला रडायला येत आहे, कारण जी भविष्यवाणी मी केली होती ती प्रत्यक्ष घडत आहे. मी दुसरी कोणती भविष्यवाणी केली असती तर चांगले होते. काश्मीरमध्ये जनमत संग्रह करावा, लोकांना स्वातंत्र्य द्यावे...ते असे का करत नाहीत? त्यांनी कोणत्या गोष्टीची भीती आहे. ते देशाची फाळणी करू इच्छित आहेत बाकी काही नाही.

Web Title: Kamal Haasan's controversial statement; It is said that PoK is independent Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.