जलिकट्टूच्या समर्थनार्थ कमल हसनही मैदानात

By admin | Published: January 24, 2017 04:42 PM2017-01-24T16:42:03+5:302017-01-24T16:43:42+5:30

जलीकट्टूच्या समर्थनार्थ तामिळनाडूमध्ये हिंसक आंदोलनाचं सत्र सुरुच आहे. चेन्नईपासून कोईम्बतूरपर्यंत राज्यभरात जलीकट्टूचे समर्थक रस्त्यावर एकवटले आहेत.

Kamal Hassan in support of Jalikattu | जलिकट्टूच्या समर्थनार्थ कमल हसनही मैदानात

जलिकट्टूच्या समर्थनार्थ कमल हसनही मैदानात

Next

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 24 - जलीकट्टूच्या समर्थनार्थ तामिळनाडूमध्ये हिंसक आंदोलनाचं सत्र सुरुच आहे. चेन्नईपासून कोईम्बतूरपर्यंत राज्यभरात जलीकट्टूचे समर्थक रस्त्यावर एकवटले आहेत. दक्षिणात्य सिनेसृष्टी व बॉलीवूडमध्ये आपल्या गुणवत्तेचा वेगळा ठसा उमटविलेले अभिनेते कमल हसन आता जलिकट्टूच्या समर्थनार्थ उतरले आहेत. 

जलिकट्टूच्या समर्थनार्थ बोलताना कमल हसन यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी पोलिसांवरही नाराजी व्यक्त केली. जलिकट्टूच्या अंदोलनात झालेल्या हिंलेला काही प्रमाणात पोलीस जबाबदर असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. पुढे बोलताना ते म्हणाले देशातल्या अनेक कायद्यांमध्ये अमूलाग्र बदलांची गरज आहे. जर वाहनांमुळे अपघात होऊन लोकांचे जीव जात असतील, तर उद्या वाहनांवरही बंदी घालणार का?

काल दक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांत यांनी देखील जलिकट्टू अंदोलनावर आपले मत व्यक्त केले होते. विद्यार्थ्यांचं प्रदर्शन भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं पाहिजे. या आंदोलनानं मोठ्या प्रमाणात स्वतःकडे लक्ष ओढून घेतलं आहे. हिंसा आणि पोलिसांचा लाठीमार पाहून माझं मन दुःखी झालं आहे. समाजातील असामाजिक तत्त्व विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी तुम्हाला विनम्रतेने आवाहन करतो की हे आंदोलन तात्काळ थांबवा, असे मत रजनिकांत यांनी व्यक्त केले होते.

Web Title: Kamal Hassan in support of Jalikattu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.