कामत, आलेमाव आणखी अडचणीत

By admin | Published: August 8, 2015 12:23 AM2015-08-08T00:23:51+5:302015-08-08T00:23:51+5:30

जैका लाच प्रकरण : लाचेची रक्कम पुरविणारा दलाल अटकेत

Kamat, come and get more trouble | कामत, आलेमाव आणखी अडचणीत

कामत, आलेमाव आणखी अडचणीत

Next
का लाच प्रकरण : लाचेची रक्कम पुरविणारा दलाल अटकेत
पणजी : जैका लाच प्रकरणातील महत्त्वाचा दुवा आणि लाचेची रक्कम पुरविणारा दलाल, हवाला एजंट रायचंद सोनी याला गुन्हा अन्वेषण विभागाने शुक्रवारी अटक केली आहे. त्याने पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात नोंदविलेल्या जबानीत दिगंबर कामत आणि चर्चिल आलेमाव यांना लाच दिल्याची कबुली दिल्यामुळे या दोघांच्या अडचणी वाढल्या आहेत.
लुईस बर्जर कंपनीकडून कामत आणि चर्चिल यांना मिळालेल्या कथित लाचेची रक्कम पुरविण्याचे काम सोनीने केले होते. तशी कबुली त्याने जवाबात दिली आहे. सोनी हा हवाला एजंट असून मोठमोठ्या रकमेची देवाणघेवाण करण्याचे काम तो करतो. पणजीत त्याचे कार्यालयही आहे. जैका प्रकल्पातील लाच प्रकरण उघडकीस आल्यानंतर तो विदेशात पळाला होता. त्याला संपर्क करून गोव्यात आणण्यात क्राईम ब्रँचने यश मिळविले.
दरम्यान, कामत यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता १२ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असून त्यांच्या जामिनाला हरकत घेताना क्राईम ब्रँचने आपले म्हणणे न्यायालयाला सादर केले आहे.
(बॉक्स)
वाचासुंदरचीही साक्ष विरोधात
लाच प्रकरणात सर्वात अगोदर अटक केलेले जैकाचे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर यांनी शेवटी लाच प्रकरणाची कबुली दिली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेले वाचासुंदर यांनी शुक्रवारी सकाळी पणजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीशांसमोर जबाब नोंदविला. त्यात कामत व चर्चिल यांना लाच दिल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांनी माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दर्शविली आहे; परंतु त्याबाबत क्राईम ब्रँचकडून निर्णय झालेला नाही.

Web Title: Kamat, come and get more trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.