कामठी....
By admin | Published: February 10, 2015 12:56 AM2015-02-10T00:56:21+5:302015-02-10T00:56:21+5:30
कामठेश्वर मंदिर बनले लाखो भाविकांचे श्रद्धास्थान
Next
क मठेश्वर मंदिर बनले लाखो भाविकांचे श्रद्धास्थानकन्हान नदी तीरावर गर्दी : महाशिवरात्री उत्सवाची जय्यत तयारीकामठी : ३५० वर्षांपूर्वी कन्हान नदीच्या तीरावर जुनी कामठी येथील प्राचीन कामठेश्वर मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. महाशिवरात्रीच्या पर्वावर नागपूरसह महाराष्ट्रातून जवळपास चार ते पाच लाख भाविक येथे नतमस्तक होऊन आपल्या मनोकामना पूर्ण करतात. येथील मंदिरात महाशिवरात्री उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. कन्हान (कर्णिका) नदीच्या तीरावर ३५० वर्षांपूर्वी भगवान शंकराचे प्राचीन ज्योतिर्लिंग कामठेश्वर मंदिर असून सूर्याची प्रथम किरणे ज्योतिर्लिंगावर पडत असतात. काही वर्षांपूर्वी राजे रघुजी भोसले कोणत्याही कामाची सुरुवात करण्यापूर्वी ज्योतिर्लिगाचे कामाष्टी यज्ञ करून आशीर्वाद घेत होते. त्यांच्या प्रत्येक कामाची सुरुवात ही यज्ञ करून होत असे. त्याच काळात भगवान श्रीराम प्रभू रामटेकवरून चित्रकूटला जात असताना जुनी कामठी कामठेश्वर मंदिरात काही वेळेसाठी वास्तव्य केले होते. त्यामुळेच या मंदिराला श्रद्धेचे स्थान प्राप्त झाले असल्याचे भाविकांनी सांगितले. या मंदिराला ओंकारेश्वर महादेव मंदिर म्हणूनदेखील ओळखल्या जाते. मंदिराला राज्य शासनाकडून तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला असून मंदिर परिसरात भगवान शिवशंकर, श्रीगणेश भगवान, श्रीअन्नपूर्णामाता, भगवान विष्णू, भगवान नारायण देव यांची प्राचीन मूर्ती विराजमान आहे. या मंदिरात प्राचीन काळापासूनच महाशिवरात्री उत्सवानिमित्त अभिषेक पूजा, आरती केली जाते.भगवान कामठेश्वराचे मंदिर कन्हान नदीच्या तीरावर असल्यामुळे मंदिर परिसर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. या परिसरात विविध विकास कामांना सुरुवात झाली आहे. मंदिरालगत उद्यान उभारले जाणार असल्याचे सांगण्यात आले. मंदिर पंचकमिटीच्या अध्यक्ष चित्रलेखा भोसले, जिजाताई आसोले, बाबूलाल हिरणवार, महादेव मामीलवार, अशोक अग्रवाल, श्रीराम कुशवाह, अनिल गडालिया, नरेश विज, युगचंद छल्लाणी, प्रकाश सिरिया, भूषण ज्योती, उत्तम सायरे, श्याम खंते, गजानन आसोले आदी अनेक भाविक उत्सवास सहकार्य करीत आहेत. महाशिवरात्री उत्सवानिमित्त ७ ते १७ फेब्रुवारीपर्यंत संगीतमय रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. १८ फेब्रुवारीला दहीकाला व महाप्रसाद सोबतच सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. या उत्सवाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पंचकमिटीने केले आहे. (तालुका प्रतिनिधी)