पोलिसांच्या दबावामुळे घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, कमलेश तिवारींच्या आईचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 07:34 PM2019-10-20T19:34:37+5:302019-10-20T19:35:11+5:30

हिंदू समाज पार्टीचे नेते कमलेश तिवारी यांची भररस्त्यात वार करून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, कमलेश तिवारी यांच्या आईने खळबळजनक दावा केला आहे.

Kamlesh Tiwari's mother claims to have met the chief minister due to police pressure | पोलिसांच्या दबावामुळे घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, कमलेश तिवारींच्या आईचा दावा

पोलिसांच्या दबावामुळे घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, कमलेश तिवारींच्या आईचा दावा

googlenewsNext

लखनौ - हिंदू समाज पार्टीचे नेते कमलेश तिवारी यांची भररस्त्यात वार करून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, कमलेश तिवारी यांच्या कुटुंबीयांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. मात्र या भेटीनंतर कमलेश तिवारी यांच्या आईने खळबळजनक दावा केला आहे. पोलिसांनी आणलेल्या दबावामुळे आम्ही योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली, असा दावा कमलेश तिवारी यांची आई कुसूम तिवारी यांनी केला. तसेच सपामधून भाजपामध्ये आलेल्या एका नेत्याने कमलेश तिवारी यांची हत्या केली असावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

कमलेश तिवारी यांची आई म्हणाली की, पोलिसांनी आणणेल्या दबावामुळे आम्ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. आम्हाला जोरजबरदस्ती करून लखनौमध्ये आणण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या तपासावर आम्ही समाधानी नाही. मृत्यू झाल्यानंतर हिंदू धर्मात 13 दिवस कुठे जात नाहीत. मात्र आम्हाला जबरदस्तीने सीतापूरहून लखनौला आणले गेले. आता आम्हाला न्याय मिळाला नाही, तर आम्ही हातात तलवार घेऊ.'' असा इशारा त्यांनी दिला. 

दरम्यान, कमलेश तिवारींच्या हत्येमागे सपामधून भाजपामध्ये आलेल्या एका नेत्याचा हात असू शकतो, असा संशय त्यांनी व्यक्त केला. कमलेश तिवारी आणि संबंधित नेत्यामध्ये रामजानकी मंदिराच्या जमिनीवरून वाद सुरू होता, असेही कमलेश तिवारींच्या आईने सांगितले. 

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या घटनेनंतर लखनऊ शहरात प्रचंड तणाव होतो, तसेच बाजारपेठा व दुकानं बंद करण्यात आली होती. कमलेश तिवारी हत्याकांडात उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला अटक केली आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसनं या प्रकरणात सूरतमधून सहा संशयितांना ताब्यात घेतलं. कमलेश तिवारी हत्या प्रकरणात बिजनोरच्या दोन मौलानांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर हत्येचा कट रचण्याचा आरोप ठेवण्यात आलाय. मौलाना मुफ्ती नईम काजमी, इमाम मौलाना अनवारुल हक यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून, 2015ला या दोन्ही मौलानांनी कमलेशला ठार करणाऱ्याला 1.5 कोटींचं बक्षीस देणार असल्याचं सांगितलं होतं. कमलेश तिवारी यांची पत्नी किरन यांनी नाका हिंडोला पोलीस स्टेशनमध्ये या दोघांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. 

Web Title: Kamlesh Tiwari's mother claims to have met the chief minister due to police pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.