कांदाचोरी: परिस्थिती जैसे थे सुरक्षा यंत्रणा तोकडी: कारवाईला गेल्यास महिला येतात अंगावर

By admin | Published: November 18, 2015 12:57 AM2015-11-18T00:57:27+5:302015-11-18T00:57:27+5:30

सोलापूर : ग्रामीण भागातून येणारा कांदा आणि तत्सम वस्तूंची राजरोस चोरी थांबवण्यात बाजार समितीला अपयश आले आह़े ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त पुराव्यासह छापले असता दुसर्‍या दिवशीही चोरीचा प्रकार निदर्शनास आला़ कांदा पळवणार्‍या महिला आणि या प्रकारात गुंतलेल्या व्यक्तींकडूनच सुरक्षा रक्षकांना धमकावणे, गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न अशा अनेक प्रकारांनी बाजार समितीही हतबल ठरली आह़े

Kandachori: The situation was like security arrangements | कांदाचोरी: परिस्थिती जैसे थे सुरक्षा यंत्रणा तोकडी: कारवाईला गेल्यास महिला येतात अंगावर

कांदाचोरी: परिस्थिती जैसे थे सुरक्षा यंत्रणा तोकडी: कारवाईला गेल्यास महिला येतात अंगावर

Next
लापूर : ग्रामीण भागातून येणारा कांदा आणि तत्सम वस्तूंची राजरोस चोरी थांबवण्यात बाजार समितीला अपयश आले आह़े ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त पुराव्यासह छापले असता दुसर्‍या दिवशीही चोरीचा प्रकार निदर्शनास आला़ कांदा पळवणार्‍या महिला आणि या प्रकारात गुंतलेल्या व्यक्तींकडूनच सुरक्षा रक्षकांना धमकावणे, गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न अशा अनेक प्रकारांनी बाजार समितीही हतबल ठरली आह़े
आशिया खंडात सोलापूरच्या बाजार समितीत मोठय़ा प्रमाणात उलाढाल होत़े अशा मोठय़ा बाजार समितीत कांदा आणि अन्य तत्सम वस्तूंच्या पूर्ण सुरक्षेची हमी कोणीही देत नाही़ इतकेच नाही तर अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी बाजार समितीतील व्यापारी आणि हमालदेखील एकत्रित येत नसल्याची खंत आह़े
दररोज कांदा आणि फळांची चोरी
या बाजार समितीत बाहेरुन कांद्याचे जवळपास 40 ट्रक आणि फळांचे काही ट्रक माल घेऊन येतात़ कांदा अडतीच्या ठिकाणी उतरवल्यानंतर शेतकरी आणि व्यापारी यांच्यात व्यवहाराच्या दरम्यान चोरीचा प्रकार घडतो़ कधी शेतकर्‍यांची तर कधी व्यापार्‍यांची नजर चुक वून महिला आणि मुले चोरीचा प्रयत्न करतात़ फळांच्या बाबतीतही अशीच स्थिती आह़े सध्या डाळिंबाची आवक मोठय़ा प्रमाणात आह़े व्यापारी आणि शेतकरी यांच्यात व्यवहार होत असताना डाळिंबाची चोरी होत़े या बाबतीत बाजार समितीचे चेअरमन यांनी असे प्रकार थांबवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केल्याचे सांगितल़े
बाजार समितीत काही ठिकाणी सीसी कॅमेरेही लावले गेले आहेत़ यापूर्वी सीसी कॅमेर्‍यांची मदत घेतली असता संबंधित महिलांना बाजार समितीच्या बाहेर काढायचे प्रयत्न केले असता त्या अंगावर धावून आल्या़ काहींनी शिवीगाळ केली़ काहींनी चक्क गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवली़ या सार्‍या प्रकारानंतर बाजार समितीने तीनही बाजूने सुरक्षा भिंतीची उंची वाढवून वरती तारेचे कुंपण बांधले तरीही कांदा आणि फळ चोरीचे प्रकार दिसून आल़े मंगळवारी दुपारी पुन्हा काही मुले भिंतीवर चढून कांदा सहकार्‍यांच्या मदतीने दोरीने बाहेर काढतानाचे दृश्य निदर्शनास आल़े
पोलिसांचीही कारवाई नाही
बाजार समितीच्या आवारात प्रवेशद्वारावरच काही खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत़ यांची संख्याही अपुरी पडत़े पाणी प्यायला गेले, जेवायला गेले, जरा इकडे तिकडे केले की बाहेरुन काही महिला आणि टारगट मुले आत प्रवेश करतात़ हातामध्ये असलेल्या पिशव्यांमध्ये नजर चुकवून मिळेल ती फळे उचलून घालताना निदर्शनास आली़ हा प्रकार बाजार समितीने काहीअंशी गांभीर्याने घेतलेले दिसते, मात्र जेलरोड पोलिसांना याचे गांभीर्य नसल्याचे निदर्शनास आल़े मंगळवारी दिवसभरात बाजार समितीत एकही पोलिसांची गाडी गस्त घातलेली निदर्शनास आली नाही़ चोरीचे प्रकार रोखण्याची नेमकी जबाबदारी कोणाची ? असा प्रश्न उपस्थित झाला आह़े

चेअरमन यांनी अनेकदा मारला फेरफटका
कांदा, फळ चोरीबाबत अनेक तक्रारी बाजार समितीचे चेअरमन दिलीप माने यांच्याकडे आल्या होत्या़ त्यांनी कधी पहाटे 4 वाजता, कधी दुपारी अचानक आतमध्ये फेरफटका मारला, तेव्हा संशयित पद्धतीने फिरणार्‍या महिला, टारगट मुले लगेच गायब होतात़ काही कर्मचारी कारवाईला गेले असता त्या अंगावर येण्याचे प्रकार घडल़े उलट असे प्रकार मिटवावे लागल़े बाजार समितीने खबरदारी म्हणून काही ठिकाणी सीसी कॅमेरेही बसवले, मात्र किती लोकांवर कारवाई करणार, प्रत्येक वेळी पोलिसांचे सहकार्य मिळतेच असे नाही असे सांगण्यात आल़े
कोट --
दिवसभरातील तीन पाळ्यांमध्ये खासगी सुरक्षा रक्षक नेमले गेले आहेत़ प्रत्येक पाळीत 8 सुरक्षा रक्षक काम करतात़ 3 पाळ्यांमध्ये 24 सुरक्षा रक्षक काम करतात़ याशिवाय बाजार समितीचे 12 कर्मचारी यावर देखरेख ठेवतात़ चोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यात मोठय़ा प्रमाणात प्रयत्न झाले आहेत़ याही पुढे प्रयत्न राहतील़ आणखी 10 सुरक्षा रक्षक वाढवत आहोत़
- धनराज कमलापुरे
सचिव, बाजार समिती़

या परिसरात येणार्‍या महिलांना थांबवणे थोडे ‘रिस्कीच’ आह़े त्यांना बाहेर काढताना अनेकदा सुरक्षा रक्षकांवर आणि बाजार समितीच्या कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करतात़ कधी - कधी त्या अंगावर धावून येतात़ अशा महिलांची मानसिकता सुधारत नाही़ व्यापारी आणि शेतकर्‍यांनीही असे प्रकार यापूर्वी हाणून पाडले आहेत़ यापुढे असे प्रकार थांबवण्याठी जास्तीत जास्त प्रयत्न करु़
- दिलीप माने
चेअरमन, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती़

Web Title: Kandachori: The situation was like security arrangements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.