सोनिया सेनेमुळे मुंबई असुरक्षित, यावेळी मी वाचले; चंदीगडला पोहोचताच कंगनाचा शिवसेनेवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 01:52 PM2020-09-14T13:52:29+5:302020-09-14T13:58:38+5:30
शिवसेनेची सोनिया सेना झाल्याने, मुंबई पूर्वीप्रमाणे सुरक्षित राहिलेली नाही, असे कंगनाने म्हटले आहे.
नवी दिल्ली/मुंबई -महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्यातील वाद अद्यापही थांबल्याचे दिसत नाही. आज कंगना मुंबईवरून मनालीला रवाणा झाली. दरम्यान, चंदीगड येथे पोहोचताच कंगनाने एक ट्विट करून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेची सोनिया सेना झाल्याने, मुंबई पूर्वीप्रमाणे सुरक्षित राहिलेली नाही, असे कंगनाने म्हटले आहे.
कंगनाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "चंदीगडमध्ये उतरताच माझी सुरक्षा नाममात्र राहिले आहे. लोक आनंदाने अभिनंदन करत आहेत. असे वाटते, यावेळी मी वाचले. एक दिवस होता, जेव्हा मुंबईत आईच्या कुशीतली उबदारता जानवत होती. आज असा दिवस आहे, जीव वाचला म्हणजे लाखो मिळवले. शिवसेनेची सोनिया सेना होताच मुंबईत दहशतमाजवणाऱ्या प्रशासनाचाच बोल बाला आहे."
चंडीगढ़ मे उतरते ही मेरी सिक्यरिटी नाम मात्र रह गयी है, लोग ख़ुशी से बधाई दे रेही हैं, लगता है इस बार मैं बच गयी, एक दिन था जब मुंबई में माँ के आँचल की शीतलता महसूस होती थी आज वो दिन है जब जान बची तो लाखों पाए, शिव सेना से सोनिया सेना होते ही मुंबई में आतंकी प्रशासन का बोल बाला।
— kangna Ranaut (@kangna_official) September 14, 2020
याशिवाय कंगनाने आणखी एक ट्विट केले आहे. यात तिने लिहिले आहे, दिल्लीचे हृदय चिरून यावर्षी तेथे रक्त सांडले, सोनिया सेनेने मुंबईत आझाद काश्मीरच्या घोषणा दिल्या. आज स्वातंत्र्याची किंमत केवळ आवाज आहे. मला आपला आवाज द्या. अन्यथा भविष्यात स्वातंत्र्याची किंमत केवळ आणि केवळ रक्तच असेल.
कंगना आणि शिवसेना वाद थांबण्याचे नाव नाही. यासंदर्भात रविवारी सायंकाळी कंगनाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली. यापूर्वी मुंबईत आपल्याला असुरक्षित वाटत आहे. तसेच येथे आपल्याला वारंवार धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोपही कंगनाने केला आहे.
मुंबईतून निघताना केले होते असे ट्विट -
कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, जब रक्षक ही भक्षक होने का एलान कर रहे हैं धडियाल बन लोकतंत्र का चीरहरण कर रहे हैं, मुझे कमजोर समझ कर, बहुत बडी भूल कर रहे हैं! एक महिला को डरा कर उसे नीचा दिखाकर, अपनी इमेज को धूल कर रहे हैं!! या शेरोशायरीतून कंगना राणौतने, महाराष्ट्र सरकारवर लोकशाहीचे वस्त्रहरण केल्याचा आरोप केला आहे. तसेच मला कमकुवत समजण्याची मोठी चूक केली. एका महिलेला घाबरवत तिच्यावर अन्याय करत स्वत:ची प्रतिमा मलीन करत असल्याचेही कंनाने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
राज्यपालांच्या भेटीनंतर कंगनाच्या हातात दिसलं कमळाचं फूल! काय आहे याचा अर्थ?
भारत-चीनदरम्यान LACवर युद्धाची तयारी? टँक्स, अधुनिक शस्त्रास्त्रे तैनात
CNG, PNG डिस्ट्रिब्यूटर होण्याची संधी, मोदी सरकार देणार लायसन्स
कोरोना व्हायरस : "जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं"; पंतप्रधान मोदींनी दिला सावधगिरीचा इशारा