मारहाणीच्या घटनेवर कंगनानं मौन सोडलं, चंदीगड विमानतळावर नेमकं काय घडलं? सर्व VIDEOमध्ये सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 07:46 PM2024-06-06T19:46:03+5:302024-06-06T19:48:47+5:30
कंगना रणौतने लोकसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर, ती दिल्लीमध्ये पक्षाच्या (भाजप) बैठकीसाठी येत होती. या दरम्यान चंदीगड विमानतळावर तिच्यासोबत हा प्रकार घडला.
हिमाचल प्रदेशातील मंडी येथून नुकतीच लोकसभा निवडणूक जिंकलेल्या आणि खासदार झालेल्या कंगना राणौतसोबत चंदीगड विमानतळावर मारहाणीची घटना घडली आहे. CISF च्या महिला जवानाने कंगनाला मारहाण केली. आता यासंपूर्ण प्रकारावर कंगनाने व्हिडिओच्या माध्यमाने प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडिओमध्ये तिने संपूर्ण घटना सांगितली आहे.
कंगना रणौतने लोकसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर, ती दिल्लीमध्ये पक्षाच्या (भाजप) बैठकीसाठी येत होती. या दरम्यान चंदीगड विमानतळावर तिच्यासोबत हा प्रकार घडला. एका महिला CISF जवानाने कंगना राणौतच्या चेहऱ्यावर थापड मारल्याचे समोर आले आहे. कुलविंदर कौर असे या महिला जवानाचे नाव आहे.
काय म्हणाली कंगना -
कंगनाने एत व्हिडिओ शेअर करत घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. या कंगना म्हणते, 'माझ्या हितचिंतकांचे आणि माध्यमांचे मला सातत्याने फोन येत आहेत. मी सर्वप्रथम सर्वांना सांगू इच्छिते की, मी सुरक्षित आहे. चंदीगड विमानतळावर माझ्यासोबत एक घटना घडली. जेथे क्रॉसिंग करताना एका महिला CISF जवानाने माझ्या तोंडावर हिट केले.'
Shocking rise in terror and violence in Punjab…. pic.twitter.com/7aefpp4blQ
— Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) June 6, 2024
का केली मारहाण? -
या व्हिडिओमध्ये कंगना पुढे म्हटले आहे, "मी त्या महिलेला विचारले की, तिने असे का केले? तेव्हा ती म्हणाली की, ती शेतकऱ्यांची सपोर्टर आहे. मी सुरक्षित आहे. मात्र, पंजाबमधील वाढता दहशतवाद कसा हाताळायचा ही माझी चिंता आहे."