हिमाचल प्रदेशातून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकते कंगना रणौत, या खास जागेवर असेल नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 10:35 AM2023-11-05T10:35:57+5:302023-11-05T10:36:37+5:30

जर भगवान श्रीकृष्णांची कृपा राहिली, तर आपण पुढची लोकसभा निवडणूक लढू, असे कंगनाने म्हटले होते.

kangana ranaut can contest lok sabha election 2024 from Himachal Pradesh, eyes will be on mandi seat | हिमाचल प्रदेशातून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकते कंगना रणौत, या खास जागेवर असेल नजर

हिमाचल प्रदेशातून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकते कंगना रणौत, या खास जागेवर असेल नजर

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने लोकसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात भाष्य केल्यानंतर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणले आहे. तिने शुक्रवारी गुजरातमधील द्वारका येथे राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. जर भगवान श्रीकृष्णांची कृपा राहिली, तर आपण पुढची लोकसभा निवडणूक लढू, असे कंगनाने म्हटले होते. कंगना मुळची हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील आहे. 

खरे तर, कंगना राणौत गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून मंडी मतदारसंघातून कंगनाला उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. येथील जातीय समीकरणाचा विचार केल्यास, या मतदारसंघ्यात राजपूत आणि अनुसूचित जातीचे मतदार अधिक आहे. कंगना राणौत देखील राजपूत आहे. कंगनाचे वडिलोपार्जित घर मंडी जिल्ह्यातील भांबला येथे आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ती सध्या कुल्लू येथील तिच्या नवीन घरी राहते. 

मंडी जिल्याचा राजकीय इतिहास असा - 
खरे तर, मंडी हा माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा मतदारसंघ आहे. 1980 च्या दशकात ते राजकारणात आले. तेव्हा काँग्रेसने पंडित सुखराम यांना या जागेसाठी उमेदवारी दिली होती. हे दोघेही केंद्रात मंत्रीही झाले. कुल्लू संस्थानाचे शासक महेश्वर सिंह हेही येथून भाजपचे खासदार राहिले आहेत. दोन्ही पक्षांनी आतापर्यंत राजपूत आणि ब्राह्मण उमेदवारांनाच या जागेसाठी उमेदवारी दिली आहे. या लोकसभा मदतारसंघात एकूण 17 विधानसभा मदारसंघ येतात.

काँग्रेससोबत आहे कंगनाच्या कुटुबा संबंध -
अभिनेत्री कंगनाचे कुटुंब पूर्वी काँग्रेस पक्षाशी जोडले गेले होते. कंगनाचे पणजोबा सरजू सिंह यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. ते काँग्रेसचे सक्रीय सदस्य होते. हिमाचल प्रदेशला जेव्हा टेरिटोरियल काउंसिलचा दर्जा मिळाला होता. तेव्हा त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि 1963 ते 1967 पर्यंत ते सदस्य होते.

Web Title: kangana ranaut can contest lok sabha election 2024 from Himachal Pradesh, eyes will be on mandi seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.