Kangana Ranaut on Kishan Bharwad: सोशल मीडियावरील पोस्टमुळे गुजरातमध्ये तरुणाची हत्या; कंगना रणौतची इन्स्टाग्रामवरील प्रतिक्रिया व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 08:12 PM2022-01-30T20:12:31+5:302022-01-30T20:13:40+5:30

या घटनेनंतर अहमदाबादमधील वातावरण चांगलेच तापले असून, राज्यभरात याचे पडसाद उमटले आहेत.

kangana ranaut react on kishan bharwad murder case in ahmedabad gujarat | Kangana Ranaut on Kishan Bharwad: सोशल मीडियावरील पोस्टमुळे गुजरातमध्ये तरुणाची हत्या; कंगना रणौतची इन्स्टाग्रामवरील प्रतिक्रिया व्हायरल

Kangana Ranaut on Kishan Bharwad: सोशल मीडियावरील पोस्टमुळे गुजरातमध्ये तरुणाची हत्या; कंगना रणौतची इन्स्टाग्रामवरील प्रतिक्रिया व्हायरल

googlenewsNext

अहमदाबाद: सोशल मीडियावरील आघाडीचा प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकवर केलेल्या एका पोस्टमुळे गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील धंधुका शहरात एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेनंतर शहरातील वातावरण चांगलेच तापले असून, राज्यभरात याचे पडसाद उमटले. या प्रकरणावर बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळख असलेल्या कंगना रणौत हिने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून, देवाच्या नावाखाली अविश्वसनीय क्रूरता सुरू असल्याचे म्हटले आहे. 

या घटनेत हत्या झालेल्या तरुणाचे नाव किशन भरवाड असे या तरुणाचे नाव आहे. मृत किशन भरवाड हा सोशल मीडियावर खूप सक्रिय होता. काही दिवसांपूर्वी त्याच्या एका फेसबुक पोस्टमुळे मुस्लीम समुदायातील लोकांनी भावना दुखावल्याचा आरोप करत त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तर या प्रकरणात किशनने माफी मागितली होती, असे सांगितले जात आहे. पोलिसांनी कारवाई करत किशन भरवाडला अटक केली होती आणि काही दिवसांनी किशनला जामिनावर सोडण्यात आले. मात्र, एके दिवशी तो काही कामानिमित्त घरातून बाहेर पडला असताना, दुचाकीस्वारांनी पाठलाग करत त्याच्यावर गोळीबार केला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. 

काय म्हणाली कंगना रणौत?

किशन भरवाड हत्येप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतने संताप व्यक्त केला आहे. कंगनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. देवाच्या नावावर अविश्वसनीय क्रूरता सुरू आहे. किशनच्या पोस्टमुळे दुखावल्याचे यांना देवाने सांगितले होते का?, जो एका फेसबुक पोस्ट दुखावतो. जो देव माफी आणि पश्चाताप स्वीकारत नाही, अशा देवाची पूजा का करावी, अशी विचारणा कंगनाने केली आहे. 

दरम्यान, या हत्या प्रकरणात गुजरात एटीएसने गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना आणि त्यांना गोळ्या पुरविणाऱ्याला व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.
 

Web Title: kangana ranaut react on kishan bharwad murder case in ahmedabad gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.