Kangana Ranaut: "फक्त दोन मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी..."; कंगना राणौतने कुणाल कामराला सुनावलं (Video)
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:48 IST2025-03-25T13:47:45+5:302025-03-25T13:48:06+5:30
Kangana Ranaut React to Kunal Kamra Row: भाजपाची खासदार कंगना राणौतची प्रतिक्रिया समोर आली आहे. अभिनेत्रीने कुणालच्या कॉमेडी एक्टचा निषेध केला आहे.

Kangana Ranaut: "फक्त दोन मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी..."; कंगना राणौतने कुणाल कामराला सुनावलं (Video)
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून सादर केलेल्या व्यंगात्मक गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. कुणाल कामरा विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. कामराने केलेल्या या टिप्पणीनंतर त्याच्या शोच्या सेटवर धडक देत शिवसैनिकांनी सेटची मोडतोड केली. याच दरम्यान आता भाजपाची खासदार कंगना राणौतने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्रीने कुणालच्या कॉमेडी एक्टचा निषेध केला आहे. "तुम्ही कोणीही असलात तरी, कोणाचाही अपमान करणं किंवा बदनामी करणं योग्य नाही. व्यक्तीसाठी आदरच सर्वस्व आहे. तुम्ही विनोदाच्या नावाखाली अपमान करत आहात. त्यांच्या कामाचा अपमान करत आहेत. शिंदेजी एकेकाळी रिक्षा चालवत होते. आज ते स्वतःच्या हिंमतीने पुढे आले आहेत. स्वतःची काय पात्रता आहे? हे लोक कोण आहेत? जे आयुष्यात काहीच करू शकले नाहीत."
#WATCH | On Kunal Kamra controversy, BJP MP Kangana Ranaut says, "...We should think where society is heading when someone does this only for 2 minutes of fame...You might be anyone, but insulting and defaming someone...A person for whom his/her respect is everything, and you… pic.twitter.com/2MBZdhebtd
— ANI (@ANI) March 25, 2025
"आपला समाज कुठे चाललाय?"
"कॉमेडीच्या नावाखाली शिवीगाळ करणं, आपल्या धर्मग्रंथांची खिल्ली उडवणं... लोकांची खिल्ली उडवणं, माता-भगिनींची खिल्ली उडवणं... आजकाल हे लोक स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणत आहेत... मला विचारायचं आहे की, आपला समाज कुठे चाललाय? फक्त २ मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी समाज कुठे चालला आहे... आपण याचा विचार करायला हवा. फडणवीसजींनी बरोबर सांगितलं आहे, त्यांचा असा विश्वास आहे की, आपण जे काही बोलतो त्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल" असं कंगनाने म्हटलं आहे.
एकनाथ शिंदेंविरोधात बोलण्यासाठी सुपारी मिळाली? कुणाल कामरा म्हणाला, "माझं बँक अकाऊंट..."
कॉमेडियन कुणाल कामरावर गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं. तुला सुपारी मिळालेली का? या प्रश्नावर तो म्हणाला, "मी का सुपारी घेऊ? तुम्ही माझं बँक अकाऊंट तपासू शकता. मी मराठीत नाही तर हिंदीत शो केला आहे. मी कोणाकडूनही सुपारी घेतलेली नाही आणि मला कोणी पैसे दिलेही नाहीत."