कंगनाचा उद्धव ठाकरेंना 'व्हिडिओ' मेसेज; म्हणाली - काल तुम्ही तुमच्या भाषणात मला शिवी दिली...!
By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 26, 2020 04:22 PM2020-10-26T16:22:53+5:302020-10-26T16:24:12+5:30
दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगना रणौतवर निशाना साधा. यानंतर, कंगनानेही ठाकरेंना तत्काळ प्रत्युत्तर दिले. तिने आधी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 'नेपोटिझ्मचे सर्वात बेकार प्रोडक्ट' म्हटले, तर आता तिने आपला एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे.
मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि कंगना रणौत (Kangana Ranaut) यांच्यात सुरू असलेल्या वादाने पुन्हा एकदा भडका घ्यायला सुरुवात केली आहे. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगना रणौतवर निशाना साधा. यानंतर, कंगनानेही ठाकरेंना तत्काळ प्रत्युत्तर दिले. तिने आधी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 'नेपोटिझ्मचे सर्वात बेकार प्रोडक्ट' म्हटले, तर आता तिने आपला एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कंगना शिवसेनेला उघड-उघड 'सोनिया सेना' म्हणताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये कंगनाने म्हटले आहे, की "उद्धव ठाकरे, तुम्ही मला काल तुमच्या भाषणात शिवी दिली. नमकहराम म्हणालात. यापूर्वीही 'सोनिया सेने'च्या अनेक लोकांनी मला उघड पणे शिवी दिली आहे, मला धमकावले आहे. माझा जबडा तोडण्यासंदर्भात भाष्य केले आहे. मला मारून टाकणे, अथवा हरामखोर म्हणणे अशा प्रकारच्या अनेक असभ्य शिव्या मला सोनिया सेनेने दिल्या आहेत. मात्र, स्त्रीसशक्तिकरणाचे ठेकेदार गप्प राहिले. त्याच भाषणात तुम्ही हिमाचलसंदर्भात, जी माता पार्वतीची जन्मभूमी आहे, त्यांना हिमाचल कन्या, म्हटले जाते, भगवान शिव शंकरांची कर्मभूमी आहे, आजही येथल्या कणा-कणात शिव-पार्वती यांचा वास आहे, याला देवभूमीही म्हटले जाते. यासंदर्भात आपण एढे तुच्छ भाष्य केले. एक मुख्यमंत्री असूनही आपण संपूर्ण राज्याची प्रतिमा खाली आणली. कारण आपण एका मुलीवर नाराज आहात आणि अशी मुलगी, जी आपल्या मुलाच्या वयाची आहे."
एवढे बोलूनच कंगना थांबली नाही, तर "मुख्यमंत्री आपण माझ्यावर फार नाराज झाला होतात, जेव्हा मी मुंबईची तुलना पीओकेसोबत केली होती आणि संविधानाचा बचाव करणारे उसळून समोर आले होते. मात्र, काल आपण आपल्या भाषणात, भारताची तुलना पाकिस्तानबरोबर केली, आता ते संविधानाला वाचवणारे, येणार नाही, कारण, त्यांच्या तोंडात कुणी पैसे कोंबत नाहीय. जे देशभक्तीसंदर्भात बोलतात, ते म्हणतात, आमच्याकडे ना पैसे आहेत ना आणखी काही, आम्हीतर देशभक्तीवर बोलतो. मात्र, देशविद्रोहासाठी आपल्या तोंडात पैसे कोंबले जातात. एका वर्किंग चीफ मिनिस्टरने उघडपणे एका मुलीला शिवी दिली, हे संविधान वाचवणारे आता काही म्हणणार नाही." कंगना पुढे म्हणाली, "मुख्यमंत्री मी तुम्हाला सांगू इच्छिते, सत्ता येतात आणि जातात. आपण केवळ एक सरकारी कर्मचारी आहात. मात्र, जी व्यक्ती एकदा आपला सन्मान गमावते, ती तो मिळवू शकत नाही..."
Message for Maharashtra government... pic.twitter.com/WfxI9EII38
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 26, 2020
उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या दसरा मेळाव्यात कंगनाचे नाव न घेता, 'मुंबई पीओके आहे, ड्रग अॅडिक्ट तर सर्वच ठिकाणी आहेत, असे काही लोक दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना हे माहीत नाही, की आम्ही आमच्या घरात तुलस उगवतो. गांजा नाही. गांजाची शेती आपल्या राज्यात होते. कोठे होते, आपल्याला माहीत आहे. आमच्या महाराष्ट्रात नाही.' एवढेच नाही, तर काही लोक मुंबईत काम करण्यासाठी येतात आणि नंतर शहराचे नाव खराब करतात. एक प्रकारे ही 'नमक हरामी' आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते.