कन्हैया कुमार तिहार तुरुंगातून सुटला
By admin | Published: March 3, 2016 06:36 PM2016-03-03T18:36:05+5:302016-03-03T19:22:56+5:30
कन्हैया कुमारची जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, थोडयाच वेळात त्याची तिहार तुरुंगातून सुटका होणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारची अखेर तिहार तुरुंगातून सुटका झाली. गुरुवारी संध्याकाळी तिहार तुरुंगात येऊन कन्हैयाच्या वकिलांनी जामिनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याची सुटका झाली.
मागच्या महिन्यात देशद्रोहाच्या आरोपाखाली त्याला अटक झाली होती. पतियाळा न्यायालयात कन्हैयावर झालेला हल्ला पाहता तिहार तुरुंगाबाहेर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे.
बुधवारी झालेल्या सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने कन्हैयाला सहा महिन्यांसाठी सर्शत हंगामी जामिन मंजूर केला. जामिन मंजूर करताना न्यायालयाने कन्हैयाला देश विरोधी कार्यक्रमामध्ये सहभागी न होण्याची अट घातली आहे. कन्हैयाचे वकील आज संध्याकाळी तिहार तुरुंगात पोहोचले आणि तुरुंग अधिका-यांना कन्हैयाच्या सुटकेची न्यायालयाची कागदपत्रे सुपूर्द केली.
#KanhaiyaKumar released from Tihar prison on interim bail: Celebrations at his residence in Begusarai,Bihar #JNURowpic.twitter.com/6rDZ2WRXDX
— ANI (@ANI_news) March 3, 2016