कन्हैय्या कुमार देशद्रोही घोषणा देणा-यांसोबत हजर होता, दिल्ली पोलिसांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2016 11:42 AM2016-02-23T11:42:47+5:302016-02-23T11:42:47+5:30
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार देशद्रोही घोषणा देणा-या विद्यार्थ्यांसोबत हजर होता अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 23 - जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार देशद्रोही घोषणा देणा-या विद्यार्थ्यांसोबत हजर होता अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आपल्या चौकशी अहवालात ही माहिती दिली आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार उद्या दिल्ली पोलीस उच्च न्यायालयात चौकशी अहवाल सादर करणार आहेत. या अहवालात कन्हैय्या कुमार देशद्रोही घोषणा देणा-या विद्यार्थ्यांसोबत दिसत असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच परवानगी नसतानादेखील विद्यार्थ्यांनी अफजल गुरुच्या समर्थनार्थ कार्यक्रम घेतला असल्याचंदेखील नमूद केलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेएनयूने केलेल्या अंतर्गत चौकशीत कन्हैय्या कुमारसोबत 8 विद्यार्थ्यांविरोधात पुरावे सापडले आहेत. या चौकशी अहवालात कन्हैय्या कुमार असंविधानिक घोषणा देतं असल्याची माहिती देण्यात आली आहे.