कन्हैयाने घेतली राहुल गांधींची भेट
By admin | Published: March 23, 2016 03:28 AM2016-03-23T03:28:02+5:302016-03-23T03:28:02+5:30
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आणि देशद्रोहाप्रकरणी जामिनावर असलेला कन्हैया
नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आणि देशद्रोहाप्रकरणी जामिनावर असलेला कन्हैया कुमार याने मंगळवारी नवी दिल्ली येथे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.
जेएनयू विद्यार्थी आणि अखिल भारतीय विद्यार्थी फेडरेशनच्या (एआयएसएफ) शिष्टमंडळासमवेत कन्हैयाने राहुल गांधी यांची त्यांच्या तुघलक मार्गावरील निवासस्थानी भेट घेतली. राहुल गांधी यांच्यासोबत तासभर चाललेल्या या बैठकीबाबत पत्रकारांशी बोलण्यास कन्हैयाने नकार दिला. तथापि, ही सदिच्छा भेट होती. कन्हैयाच्या नेतृत्वाखालील जेएनयू शिष्टमंडळाने राहुल गांधी यांची भेट घेतली. विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल शिष्टमंडळाने राहुल यांचे आभार मानले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राहुल गांधी यांनी केवळ जेएनयू आंदोलनालाच पाठिंबा दिला असे नाही, तर त्यांनी पुण्यातील एफटीआयआय आणि आयआयटी मद्रास येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाही पाठिंबा दिला होता.’ असे एनएसयूआयचे अध्यक्ष रोजी एम. जॉन म्हणाले.
‘एआयएसएफचे विद्यार्थी नेते आणि जेएनयूएसयूच्या अध्यक्षाच्या शिष्टमंडळाची भेट घेतली,’ असे राहुल गांधी यांनी टिष्ट्वटवर म्हटले आहे. कन्हैयाला अटक झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ फेब्रुवारीला राहुल गांधी यांनी जेएनयू कॅम्पसला भेट दिली होती. (वृत्तसंस्था)