गुन्हा दाखल झाल्यानंतर कनिका कपूर वठणीवर; सरकारला दिली 'ऑफर'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 04:12 PM2020-04-27T16:12:50+5:302020-04-27T16:14:30+5:30
कनिकाने परदेशातून परतल्यानंतर आयसोलेशनमध्ये न राहाता काही पार्टींना हजेरी लावली होती. त्यामुळे कनिका विरोधात लखनऊमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाची लागण झाल्याचे लपविले आणि पार्ट्यांमध्ये सहभागी होऊन गेल्या महिन्यात खळबळ उडवून देणाऱी बॉलिवूडची गायिका कनिका कपूर अडचणीत आली आहे. तिच्या निष्काळजीपणामुळे लोकांनी चांगलेच तोंडसुख घेतले असून सरकारनेही गुन्हा दाखल केला आहे. यामुळे कनिकाने आता सरकारसमोर एक ऑफर ठेवली आहे.
दिल्लीमध्ये प्लाझ्मा थेरपी कोरोनावर प्रभावी ठरली. तेथील चार रुग्ण ठणठणीत बरे झाले. यामुळे कनिकानेही कोरोना ग्रस्तांच्या रुग्णांवर उपचारासाठी तिचा प्लाझ्मा देणार असल्याचे सरकारला कळविले आहे. यासाठी तिने एसजीपीजीआय़शी संपर्क साधला असून डॉक्टरांचे पथक लवकरच तिच्या शालीमार गॅलेंट अपार्टमेंटमध्ये प्लाझ्मा घेण्यासाठी जाणार आहे.
कनिकाने परदेशातून परतल्यानंतर आयसोलेशनमध्ये न राहाता काही पार्टींना हजेरी लावली होती. त्यामुळे कनिका विरोधात लखनऊमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. कनिकाविरोधात कलम 188, 269 आणि 270 च्या अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता लखनऊचे पोलिस कमिश्नर सुजीत पांडे यांनी कनिकाची याबाबत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. कनिका सध्या १४ दिवस आयसोलेशनमध्ये असून त्यानंतर तिची चौकशी केली जाणार आहे.
कनिका कपूर १७ मार्चला लंडनवरून भारतात परतली होती. लंडनवरून भारतात परतल्यावर कनिकाने एक हायप्रोफाइल पार्टी सुद्धा अटेंड केली होती. ज्यात राजकीय वतुर्ळातील अनेक नेते आणि जज यांच्यासह जवळपास 400 लोक सामील झाले होते. या यानंतर कनिका कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट होताच सगळ्यांचे धाबे दणाणले होते. निष्काळजीपणा बाळगून अनेकांचा जीव धोक्यात आणल्याबद्दल तिच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
अन्य बातम्या वाचा...
CoronaVirus शारीरिक संबंधाद्वारे कोरोना पसरतो? वुहानमध्ये संशोधन
यही मौका है! नितीन गडकरींनी सांगितला चीनवर 'वार' करण्याचा प्लॅन
बळ दे झुंजायाला... लॉकडाऊनदरम्यान कर्तव्य बजावताना पोलिसाने अदा केला नमाज; नेटिझन्सचा सलाम!
एक नाही, तर तीन प्रकारच्या कोरोनाचा देशावर हल्ला; गुजरातचे संशोधक धास्तावले
CoronaVirus नफेखोरी! 245 ची रॅपिड टेस्टिंग किट ६०० रुपयांना खरेदी; काँग्रेसने विचारला जाब
युएईचे भारतीय अरबपती बी. आर. शेट्टी 'कंगाल'; एका अहवालाने साम्राज्याला सुरुंग लावला