"मुलीच्या शिक्षणावर कशाला खर्च करता?"; लेकीने डॉक्टर बनून लोकांची केली बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 12:56 PM2023-09-23T12:56:45+5:302023-09-23T12:57:39+5:30

कनिका पोपली हिला लहानपणापासूनच डॉक्टर व्हायचं होतं. सुरुवातीपासूनचं स्वप्न होतं. ती खूप हुशार होती.

kanika popli about whom people said why spend on girl education | "मुलीच्या शिक्षणावर कशाला खर्च करता?"; लेकीने डॉक्टर बनून लोकांची केली बोलती बंद

"मुलीच्या शिक्षणावर कशाला खर्च करता?"; लेकीने डॉक्टर बनून लोकांची केली बोलती बंद

googlenewsNext

मुलीच्या शिक्षणावर पैसे खर्च करणं अनेकांना पैसे वाया घालवण्यासारखं वाटतं. पण अशा विचारसरणीच्या लोकांना एका तरुणीने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. शिक्षण घेऊन, घवघवीत यश संपादन करून असं म्हणणाऱ्यांची बोलती बंद केली आहे. कनिका पोपली हिला लहानपणापासूनच डॉक्टर व्हायचं होतं. सुरुवातीपासूनचं स्वप्न होतं. ती खूप हुशार होती. यानंतर कनिका आज डॉक्टर आहे. 

इन्स्टाग्रामवर कनिकाचे हजारो फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. कधी कधी लोक तिच्या पालकांना विचारायचे की मुलीच्या शिक्षणावर का खर्च करता. कनिका डॉक्टर झाली आणि सगळ्यांची बोलती बंद केली. कनिका लहानपणापासूनच खूप शिस्तप्रिय आहे. कनिकाने पूर्ण NEET परीक्षा दिली. उत्कृष्ट रँक मिळवली. 

मुझफ्फरनगरच्या मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण घेतले. मात्र, ती इथेच थांबली नाही. यानंतर एमडीही केले. स्पेशलायझेशन डर्मेटोलॉजी (त्वचा रोग) मध्ये आहे. कनिका पोपली सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर 34 हजार फॉलोअर्स आहेत. डॉक्टर असण्यासोबतच ती YouTuber देखील आहे. 

लोकांना तिच्या पोस्ट खूप आवडतात. कनिका मुलगी आहे म्हणून तिच्यावर पैसे खर्च करू नका असा सल्ला अनेक पालकांना देत होते. आज तेच लोक कनिकाकडे उपचारासाठी येतात. कनिकाच्या आई-वडिलांनी कधीच लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: kanika popli about whom people said why spend on girl education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.