आश्चर्यकारक! क्वारंटाइन सेंटरमध्ये ५८० रुपयांना खरेदी केले एक किलो टोमॅटो 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 04:52 PM2020-08-30T16:52:39+5:302020-08-30T17:01:48+5:30

इमलीपारामधील क्वारंटाइन सेंटरमध्ये इतर राज्यातील कामगार आणि विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती.

kanker chhattisgarh 1 kg tomato bought kanker quarantine center 580 rs congress mla s sori officers amazing | आश्चर्यकारक! क्वारंटाइन सेंटरमध्ये ५८० रुपयांना खरेदी केले एक किलो टोमॅटो 

आश्चर्यकारक! क्वारंटाइन सेंटरमध्ये ५८० रुपयांना खरेदी केले एक किलो टोमॅटो 

Next
ठळक मुद्देइमलीपारा क्वारंटाइन सेंटरमध्ये भाजीसाठी टोमॅटो 580 रुपये प्रति किलो दराने खरेदी करण्याचे बिल देण्यात आले आहे.माहितीच्या अधिकार (आरटीआय) अंतर्गत मिळालेल्या कागदपत्रांमध्ये ही बाब उघडकीस आली आहे.

कांकेर : छत्तीसगडमधील एका क्वारंटाइन सेंटरमध्ये टोमॅटो प्रति किलो 580 रुपये दराने खरेदी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. कांकेर जिल्ह्यातील इमलीपारा क्वारंटाइन सेंटरमध्ये महाग दराने टोमॅटो खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे. तर या प्रकरणी अधिकाऱ्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

लॉकडाऊन दरम्यान इमलीपारामधील क्वारंटाइन सेंटरमध्ये इतर राज्यातील कामगार आणि विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती. या लोकांच्या जेवणाच्या व्यवस्थेत मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जात आहे. माहितीच्या अधिकार (आरटीआय) अंतर्गत मिळालेल्या कागदपत्रांमध्ये ही बाब उघडकीस आली आहे. दिलेल्या माहितीनुसार, इमलीपारा क्वारंटाइन सेंटरमध्ये भाजीसाठी टोमॅटो 580 रुपये प्रति किलो दराने खरेदी करण्याचे बिल देण्यात आले आहे. पण, त्यावेळी टोमॅटोची कमाल किंमत प्रति किलो 20 रुपये सांगितली जात आहे. तसेच, अन्य भाजीपाल्यांच्या किंमतीही बाजारभावापेक्षा जास्त लिहिण्यात आल्या आहेत.

इमलीपारा क्वारंटाइन सेंटरमध्ये खाद्यपदार्थांच्या पुरवठ्यासाठी आदिवासी कल्याण विभागाकडे जबाबदारी जिल्हा प्रशासनाने सोपविण्यात आली होती. विभागाने बाजारभावापेक्षा कित्येक पटीने जास्त किंमतीवर खरेदी करण्याचे बिल दिले आहे. तसेच, विभागानेही त्यासाठी पैसे दिले आहेत. इतकेच नाही तर क्वारंटाईन सेंटरमध्ये खरेदी केलेल्या साहित्याच्या बिलात जीएसटी (GST) आणि टिन नंबर (TIN) देण्यात आलेला नाही. कागदपत्रांनुसार लॉकडाऊन दरम्यान या क्वारंटाईन सेंटरमध्ये व्यवस्था करण्यासाठी 1 कोटी 67 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

दरम्यान, इमलीपाराच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये बाजारभावापेक्षा अधिक महागड्या दराने टोमॅटो व इतर भाज्यांची खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक आमदार आणि राज्य सरकारचे संसदीय सचिव शिशुपाल सोरी यांनी केली आहे. हा अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा खुला खेळ आहे. अधिकाऱ्यांनी आश्चर्यकारक काम केले. यामध्ये जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी सरकारकडे करणार आहे, असे शिशुपाल यांनी सांगितले. तर या प्रकरणी प्रशासनाची बाजू मांडण्यासाठी कांकेर जिल्हाधिकारी के.एल. चौहान यांना कॉल केला. पण, त्यांच्याकडून यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर मेसेज करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

आणखी बातम्या...

- 'या' फोटोने आनंद महिंद्रांचे जिंकले मन; नितीन गडकरींना केली विनंती अन् म्हणाले...  

काय असतात VIP फोन नंबर्स? लाखो रुपयांना विकले जातात...

-  धक्कादायक! आजीनं कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याच्या नातीला १ लाख रुपयांना विकलं    

- अ‌ॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर

- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा    

- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार    

CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    

आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार  

Web Title: kanker chhattisgarh 1 kg tomato bought kanker quarantine center 580 rs congress mla s sori officers amazing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.