कन्नड अभिनेता दर्शन तुरुंगात मौजमजेत; गुंड मित्रांसोबत बसल्याचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 21:11 IST2024-08-25T21:10:51+5:302024-08-25T21:11:15+5:30
दर्शन हा सध्या बंगळुरुच्या परप्पना अग्रहारा केंद्रीय कारागृहात आहे. दर्शनसोबत असे कैदी दिसत आहेत जे गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत आहेत.

कन्नड अभिनेता दर्शन तुरुंगात मौजमजेत; गुंड मित्रांसोबत बसल्याचा व्हिडीओ व्हायरल
रेणुका स्वामी मर्डर केसमध्ये तुरुंगात असलेला कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा याला तुरुंगात व्हीआयपींपेक्षाही भारी वागणूक मिळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दर्शन त्याच्या मित्रांसह मस्त लॉनवर खुर्च्यांवर बसून चहाचा आस्वाद घेत असल्याचे दिसत आहे. सिगरेटही पित असल्याचे दिसत आहे, यामुळे कर्नाटकमध्ये खळबळ उडाली आहे.
दर्शन हा सध्या बंगळुरुच्या परप्पना अग्रहारा केंद्रीय कारागृहात आहे. दर्शनसोबत असे कैदी दिसत आहेत जे गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत आहेत. या व्हिडीओनंतर तुरुंग प्रशासनात खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे.
दर्शनला त्याची मैत्रीण अभिनेत्री पवित्रा गौड़ासह अनेक आरोपींना रेणुका स्वामीच्या मृत्यूप्रकरणात अटक करण्यात आली आहे. रेणुका ही ऑटो चालक होती तिचा मृतदेह ९ जूनला एका फ्लायओव्हरच्या जवळ मिळाला होता. ती दर्शनची फॅन होती. अभिनेत्याच्या सांगण्यावरून तिचे एका टोळक्याने अपहरण केले होते. रेणुका ही पवित्राला त्रास देत होती, यामुळे हे सर्व केले गेले होते.
दर्शनला घरचे जेवण नाकारण्यात आले होते. रेणुकाला मारण्यासाठी ३० लाखांची सुपारी देण्यात आली होती. यापैकी ५ लाख रुपये टोळक्याला देण्यात आले होते. रेणुकाचा मृतदेह मिळाल्यानंतर दर्शनचा हात असल्याचे समोर आले होते. रेणुका स्वामीला एका गावात नेत तिला मारहाण करण्यात आली होती. यात तिचा मृत्यू झाला होता. याची माहिती आरोपीने दर्शनला व्हॉट्सअपवरून दिली होती.