शानदार जबरदस्त जिंदाबाद! तीन वर्षात एकट्यानं खोदला १६ एकरांचा तलाव, बुंदेलखंडच्या 'मांझी'ची प्रेरणादायी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 01:34 PM2022-04-09T13:34:10+5:302022-04-09T13:35:32+5:30

उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एका साधूने एकट्याने तीन वर्षे कोरडा प्राचीन तलाव खोदला असून ते आता बुंदेलखंडचे 'मांझी' म्हणून प्रसिद्धीस आले आहेत.

kanpur city sant krishna nand as manjhi of bundelkhand will awarded soon in vidhan parishad | शानदार जबरदस्त जिंदाबाद! तीन वर्षात एकट्यानं खोदला १६ एकरांचा तलाव, बुंदेलखंडच्या 'मांझी'ची प्रेरणादायी कहाणी

शानदार जबरदस्त जिंदाबाद! तीन वर्षात एकट्यानं खोदला १६ एकरांचा तलाव, बुंदेलखंडच्या 'मांझी'ची प्रेरणादायी कहाणी

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एका साधूने एकट्याने तीन वर्षे कोरडा प्राचीन तलाव खोदला असून ते आता बुंदेलखंडचे 'मांझी' म्हणून प्रसिद्धीस आले आहेत. दररोज फावडा घेऊन खोदकाम करुन त्यांनी तलावाचं रुपडंच पालटून टाकलं आहे. त्यामुळे आता तलाव वर्षभर पाण्याने भरलेला असतो. गावातील लोकांच्या गरजाही या तलावामुळे पूर्ण होत आहेत. या साधूला शासनाकडूनही सन्मान मिळाला आहे.

हमीरपूर जिल्ह्यातील सुमेरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पचखुरा गावात एका वृद्ध साधूने प्राचीन तलावाचे रुपडे पालण्याचे मोठे काम केले आहे. या गावात १६ एकर क्षेत्रात एक तलाव आहे. हा तलाव देखील शेकडो वर्षे जुना आहे, जो कलारण दाई या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तलावाचे कधीही खोदकाम न झाल्याने त्याचे रूपांतर शेतात झाले. गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार, एकेकाळी हा तलाव वर्षभर पाण्याने भरलेला असायचा. मात्र गेल्या काही दशकांपासून या प्राचीन तलावात फक्त धूळ उडत होती.

हिवाळ्याच्या काळात गावातील तरुण या कोरड्या तलावाला क्रिकेटचे पीच बनवत असत, त्यामुळे तलाव नकाशावरूनही गायब झाला होता. मात्र तलावाच्या दुर्दशेबाबत कोणीही पुढे आले नाही. तलावाचे रूपांतर शेतात झाल्याने ग्रामस्थ व गुरांसमोर पाण्याचे संकट उभे ठाकले होते. या गावात अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात पाण्याचे संकट होते, मात्र गावातील कृष्ण नंद महाराज यांनी हे संकट आव्हान म्हणून स्वीकारत फावडा हाती घेतला. त्यानंतर तीन वर्षांत तलावाचे स्वरूपच पालटले आहे. 

तलाव खोदण्यासाठी संताने तीन वर्ष केले खोदकाम
पाचखुरा बुजुर्ग गावचे रहिवासी संत कृष्ण नंद महाराज यांनी 1982 मध्ये संन्यास घेतला. 1986 मध्ये हरिद्वारमध्येच झालेल्या कुंभमेळ्यात त्यांनी महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरी महाराज यांच्याकडून गुरुदक्षिणा घेतली आणि तेथेच राहू लागले होते. 2014 मध्ये ते हरिद्वारहून गावी परतले आणि त्यांनी गावातील रामजानकी मंदिराला आपले आश्रयस्थान बनवले. मंदिराजवळील पुरातन तलावाची दुर्दशा पाहून त्यांनी मोठा निर्णय घेत 2015 साली फावडे उचलून एकट्याने तलाव खोदण्यास सुरुवात केली. सलग तीन वर्षे कोरड्या तलावाचे उत्खनन करून गावातील या संताने तलावाच्या तळापासून तीन हजारांहून अधिक ट्रॉली माती खोदून त्याचे पुन्हा तलावात रूपांतर केले आहे.

संत कृष्ण नंद महाराज आता बुंदेलखंडचे 'मांझी' झालेत
संत कृष्ण नंद महाराज यांच्या कामाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे. तीन वर्षांत कोरड्या तलावाचे उत्खनन करून त्याला जुन्या स्वरूपात आणल्यानंतर आता गावकरी त्यांना बुंदेलखंडचे 'मांझी' म्हणून लागले आहेत. गेल्यावर्षी हा तलाव उन्हाळ्यात पाण्याने भरला होता. यावेळी तलावातील पाणी कमी होत असल्याचे पाहून संताने पुन्हा फावडे उचलले आहे. गेल्या जानेवारीपासून ते तलावात फावडे घेऊन सातत्याने खोदकाम करत आहेत. त्यामुळे कडक उन्हात ते सुकण्याची शक्यता आता संपुष्टात आली आहे. गावातील इंदलसिंग यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी सांगितले की, हा तलाव शेकडो वर्षे जुना असून, त्याचे अस्तित्वच नाहीसे झाले होते. मात्र अवघ्या तीन वर्षांत बाबा कृष्ण नंद महाराज यांनी स्वत:च फावडे वापरून तलावाचे स्वरूप पालटले आहे.

स्वयंसेवी संस्थांनीही केला सन्मान
प्राचीन वारसा आणि तलाव जपण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे संत कृष्ण नंद महाराज म्हणतात. 2016 मध्ये तत्कालीन राज्यमंत्री राजकुमारी कुशवाह यांनी गावात येऊन त्यांना वीस हजार रुपयांचे बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला होता, तर डेहराडूनच्या मीनाक्षी अरोरा यांनीही गावात येऊन त्यांचा गौरव केला होता. गावातील तलावाचे स्वरूप बदलल्याच्या वृत्तावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही ट्विट केले होते. तर काँग्रेसच्या बड्या नेत्यांनीही गावात येऊन त्यांचे कौतुक केले आहे. 

Web Title: kanpur city sant krishna nand as manjhi of bundelkhand will awarded soon in vidhan parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.