'ओमायक्रॉन सर्वांना मारून टाकेल...', डॉक्टरने पत्नी-मुलांना मारण्याआधी लिहिली १० पानांची नोट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 01:54 PM2021-12-04T13:54:13+5:302021-12-04T13:54:35+5:30
Kanpur Triple Murder : जेवढी ही घटना खळबळजनक आहे, जेवढीच थरकाप उडवणारी त्याने लिहिलेली नोट आहे. ज्यात त्याने लिहिलं की, 'ओमायक्रॉन सर्वांना मारून टाकेल'.
कानपुर - भारतात कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची एन्ट्री झाली आहे. बंगळुरूमध्ये ४६ वर्षीय डॉक्टर पॉझिटिव्ह आढळून आला आहे. स्वत: ओमायक्रॉनने पॉझिटिव्ह होऊनही ते घाबरले नाहीत आणि ते सेल्फ आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत. तेच कानपुरमधील (Kanpur Triple Murder) एक दुसरा डॉक्टर ओमायक्रॉनमुळे (Omicron) इतका तणावात आला की, त्याने त्याचा संपूर्ण परिवाराच संपवला. जेवढी ही घटना खळबळजनक आहे, जेवढीच थरकाप उडवणारी त्याने लिहिलेली नोट आहे. ज्यात त्याने लिहिलं की, 'ओमायक्रॉन सर्वांना मारून टाकेल'.
डॉक्टरने पत्नीच्या डोक्यावर हातोडा मारून तर मुलगा आणि मुलीचा गळा दाबून त्यांचा जीव घेतला. डॉक्टरने या ट्रिपल मर्डरची माहिती व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपल्या भावाला दिली. यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांना घटनास्थळी एक डायरी सापडली. ज्यात त्याने लिहिलं होतं की, 'अब और कोविड नहीं। ये कोविड सबको मार डालेगा। अब लाशें नहीं गिननी।
सर्वांनाच बसला धक्का
डिविनिटी अपार्टमेंटमध्ये राहणारे डॉक्टर सुशील रामा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. परिवारात पत्नी चंद्रप्रभा (४८), मुलगा शिखर (१८) आणि मुलगी खुशी राहत होते. शुक्रवारी सायंकाळी डॉक्टर सुशील कुमारने पत्नीसहीत मुलगी आणि मुलाची हत्या केली. डॉक्टर सुशील कुमारने भावाला मेसेज करून सांगितलं की, पोलिसांना इन्फॉर्म कर मी डिप्रेशनमध्ये आहे. हा मेसेज वाचून भाऊ सुनील फ्लॅटचा दरवाजा तोडून आत शिरला तर समोर जे दिसलं ते बघून शॉक्ड झाला.
'...और लाशें नहीं गिननी'
रूममद्ये सापडलेल्या डायरीत लिहिलं आहे की, 'आता आणखी कोविड नाही. हा ओमायक्रॉनही सर्वांना मारून टाकेल. आता अजून मृतदेह मोजायचे नाहीत. आपल्या निष्काळजीपणामुळे करिअरच्या अशा ठिकाणी पोहोचलो आहे की, तेथून निघणंही शक्य नाही. माझं काही भविष्य नाहीये. मी पूर्ण शुद्धीत आपल्या परिवाराला संपवून, स्वत:ला संपवत आहे. याला जबाबदार दुसरं कुणी नाही'.
'माझी आत्मा मला माफ नाही करणार'
१० पानांवर लिहिलं आहे की, 'मी उपचार होऊ न शकणाऱ्या आजाराने ग्रस्त झालो आहे. भविष्य काहीच दिसत नाहीये. याशिवाय माझ्याकडे दुसरा काही मार्ग नाही. मी माझ्या परिवाराला कष्टात सोडू शकत नाही. सर्वांना मुक्त करत आहे. सगळे कष्ट एका क्षणात दूर करत आहे. माझ्या पश्चात मी कुणालाही कष्टात बघू शकत नाही. माझी आत्मा मला कधीच माफ करणार नाही. डोळ्यांच्या उपचार होऊ न शकणाऱ्या आजारामुळे मला असं पाउल उचलावं लागत आहे. शिकवणं माझा पेशा आहे. जर माझे डोळेच राहिले नाही तर मी काय करणार'.
डॉक्टर सुशीलच्या घरातील लोकांनी सांगितलं होतं की, गेल्या काही महिन्यांपासून तो डिप्रेशनमध्ये होता. पण परिवाराने हे नाही सांगितलं की, डॉक्टर सुशील कोणत्या प्रकारच्या डिप्रेशनमध्ये होता किंवा कोणत्या कारणाने डिप्रेशनमध्ये होता.