Kanpur Violence: आता चालणार 'बाबा का बुलडोजर', कानपूर हिंसाचारानंतर पोलीस आयुक्तांनी जारी केली 100 घरांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 11:08 AM2022-06-08T11:08:13+5:302022-06-08T11:08:25+5:30

Kanpur Violence: कानपूर हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींच्या अवैध घरांवर आता बुलडोझर चालणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून, शंभरहून अधिक घरांची यादी तयार करण्यात आली आहे.

Kanpur Violence: Bulldozer action on Kanpur violence accused, list of 100 illegal houses released by Commissioner of Police | Kanpur Violence: आता चालणार 'बाबा का बुलडोजर', कानपूर हिंसाचारानंतर पोलीस आयुक्तांनी जारी केली 100 घरांची यादी

Kanpur Violence: आता चालणार 'बाबा का बुलडोजर', कानपूर हिंसाचारानंतर पोलीस आयुक्तांनी जारी केली 100 घरांची यादी

googlenewsNext

Kanpur Violence: 3 जून रोही शुक्रवारच्या नमाजानंतर कानपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 54 आरोपींना अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी स्थानिक भाजप नेत्यालाही अटक केली आहे. त्याचबरोबर शहरात बुलडोझर चालवण्याची तयारी सुरू झाली आहे. कानपूरमधील नवीन रस्ता आणि आजूबाजूच्या परिसरातील बेकायदेशीरपणे बांधलेल्या इमारतींवर बुलडोझर चालणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तांनी 100 हून अधिक इमारतींची यादी केडीए वीसीकडे पाठवली आहे. या इमारतींच्या नकाशासोबत कायदेशीर की बेकायदेशीर याचीही माहिती मागवण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनानेही केडीएला चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यादीच्या पडताळणीनंतर प्रशासन आणि पोलिसांकडून बेकायदा इमारतींवर झटपट कारवाई सुरू केली जाणार आहे.

आतापर्यंत 54 जणांना अटक 
कानपूर हिंसाचार प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे त्यात असलेल्या आरोपींचे चेहरेही समोर येत आहेत. कानपूर पोलिसांनी आतापर्यंत 54 आरोपींना अटक केली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कानपूर हिंसाचारप्रकरणी स्थानिक भाजप नेत्यासह 12 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. भाजप युवा मोर्चाचा माजी जिल्हा सचिव हर्षित श्रीवास्तव याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रक्षोभक मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पीआयएफचे सदस्य अठकेत
कानपूर पोलिसांनी पीएफआयच्या पाच सदस्यांचीही ओळख पटवली असून त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. कानपूरचे पोलीस आयुक्त विजयसिंह मीना यांनी सांगितले की, कानपूर हिंसाचारात अटक करण्यात आलेल्या आरोपींशी असलेल्या संबंधांच्या आधारे पीएफआयच्या तीन सदस्यांना अटक करण्यात आली आहे. आणखी अनेक संशयितांना ताब्यात घेऊन पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

पेट्रोल पंपाचा परवाना रद्द
कानपूरमधील डेप्युटी पॅडजवळील पेट्रोल पंपावरुन हिंसाचार पसरवणाऱ्यांना बाटल्यांमध्ये पेट्रोल देण्यात आले. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये याचे पुरावे मिळाले आहेत. कारवाई करत पेट्रोल पंपाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. कानपूरमधील हिंसाचारात पेट्रोल बॉम्बचा प्रचंड वापर करण्यात आला, याशिवाय दगडफेकही करण्यात आली.

सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध घेतला जात आहे
कानपूरमध्ये हिंसाचार कसा वाढला आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचाही एटीएस प्रत्येक अँगलने तपास करणार आहे. यासाठी एडीजी एटीएस नवीन अरोरा कानपूरला पोहोचले असून, त्यांच्यासोबत खास कमांडोही उपस्थित आहेत. अरोरा एटीएसच्या जवानांसह हिंसाचारग्रस्त भागात गस्त घालत आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपींची ओळख पटवली जात आहे. 

Web Title: Kanpur Violence: Bulldozer action on Kanpur violence accused, list of 100 illegal houses released by Commissioner of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.