झोपडी हटवण्यासाठी आलेल्या भाजपा नेत्याला महिलेची बेदम मारहाण, कपडे फाडले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 05:40 PM2023-10-05T17:40:10+5:302023-10-05T17:52:53+5:30

मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यानंतर भाजपा नेत्याने आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

kanpur woman beat up bjp leader who came to remove hut tore his clothes fir registered | झोपडी हटवण्यासाठी आलेल्या भाजपा नेत्याला महिलेची बेदम मारहाण, कपडे फाडले अन्...

फोटो - आजतक

googlenewsNext

कानपूरमध्ये एका महिलेची झोपडी हटवण्यासाठी आलेल्या भाजपा युवा मोर्चा मंडळाच्या अध्यक्षाला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. महिला आणि तिच्यासोबत असलेल्या लोकांनी भाजपा नेत्याला मारहाण केली आणि त्याचे कपडेही फाडले. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यानंतर भाजपा नेत्याने आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

एका महिलेनेही त्याचवेळी भाजपा नेत्याविरोधात विनयभंगाची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी या तरुणाला (भाजप नेता) मारहाण केली आहे. त्याचे कपडेही फाडले. एफआयआर नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास केला जात आहे.

कानपूरच्या नर्वल भागात असलेल्या भगुआ पूर गावात ही घटना घडली आहे. जिथे भाजपा युवा मोर्चा मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर साहू काही लोकांसोबत एका महिलेची झोपडी दाखवण्यासाठी गेले होते. राजकिशोरने तेथे जमिनीचा सौदा केल्याचे सांगितले जात आहे. जमिनीच्या शेजारीच एका महिलेची झोपडी होती ती हटवण्याबाबत बोलायला आले होते.

दरम्यान, महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी राजकिशोरला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारामारीत राजकिशोरचे कपडे फाडून त्याला अर्धनग्न करण्यात आले. ही महिला काही लोकांना व्हिडीओ बनवण्यास सांगत होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

या प्रकरणी राजकिशोरने महिला आणि तिच्या कुटुंबियांविरोधात मारहाणीचा एफआयआर दाखल केला असून, त्याची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, महिलेने भाजपा नेते राजकिशोर यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात विनयभंगाचा तक्रार केली आहे.

एसीपी अमरनाथ यादव यांनी सांगितले की, महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी राजकिशोरला मारहाण केली. त्याचे कपडेही फाडले. ज्याचा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आम्ही संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहोत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: kanpur woman beat up bjp leader who came to remove hut tore his clothes fir registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा