'आप'साठी सिद्धू 'दी कपिल शर्मा शो' सोडणार ?

By admin | Published: July 22, 2016 05:25 PM2016-07-22T17:25:18+5:302016-07-22T17:25:18+5:30

देशभरात आज सिद्धूंचा मोठा चाहतावर्ग आहे. खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते लवकरच 'दी कपिल शर्मा शो' ला रामराम ठोकणार असल्याचे वृत्त आहे.

Kapil Sharma to leave Sidhu for AAP? | 'आप'साठी सिद्धू 'दी कपिल शर्मा शो' सोडणार ?

'आप'साठी सिद्धू 'दी कपिल शर्मा शो' सोडणार ?

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ : क्रिकेटपटू, समालोचक, राजकारणी ते अभिनेता असा प्रवास करणारे नवज्योत सिंग सिद्धू यांनी तडफाफडकी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिल्याने ते चर्चेत आले होते. वरील चारही क्षेत्रात सिद्धूंनी आपला प्रभावी ठसा उमटवल्यामुळे देशभरात आज त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झालेला आहे. खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते लवकरच 'दी कपिल शर्मा शो' ला रामराम ठोकणार असल्याचे वृत्त आहे.

नुकत्याच मिळालेल्या माहीतीनुसार, सिद्धू लवकरच 'आप' मध्ये प्रवेश करणार आहेत. 'आप' पक्षाच्या इमेजसाठी सिद्धू कपिल शर्माचा शो सोडणार आहेत. सिद्धूनं त्याची प्रतिमा बदलण्यासाठी कपीलचा शो सोडावा असा सल्ला त्याला त्याच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आला आहे. सिद्धूनंही हा सल्ला गांभिर्यानं घेतला आहे. त्यामुळे सिद्धू कपीलचा शो सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत, अशी चर्चा आहे. त्यांनी कपिल शर्माचा शो जर सोडला तर प्रेषकांना पुन्हा गुरुची शायरी आणि ठोको ताली सारखे शब्द ऐकण्यास मिळणार नाहीत. कॉमेडी नाईटस विथ कपिल या लोकप्रिय कार्यक्रमात ते विनोदांन भरभरुन दाद देताना दिसतात.

दरम्यान, ३ वर्षापासून सिद्धू कपीलच्या शो चे जज आहेत. कपीलच्या शोमध्ये न जाण्याबद्दल सिद्धूला सांगण्यात आल्याचंही बोललं जात आहे.

 

Web Title: Kapil Sharma to leave Sidhu for AAP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.