कपिल शर्मा करणार 'नेत्रदान '
By Admin | Published: March 5, 2017 11:41 PM2017-03-05T23:41:43+5:302017-03-06T02:00:28+5:30
कॉमेडी किंग कपिल शर्माने डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन शो 'द कपिल शर्मा शो' मध्ये त्यांने हा खुलासा केला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - कॉमेडी किंग कपिल शर्माने डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन शो 'द कपिल शर्मा शो' मध्ये त्यांने हा खुलासा केला आहे. आज शो मध्ये नुकताच पाक ला पराभव करत विश्वचषक जिंकणाऱ्या अंध क्रिकेट संघातील काही सदस्यांनी हजेरी लावली होती. शोमध्ये बातचीत करताना त्यांच्याकडून प्रेरणा मिळाल्यानंतर ही महत्वपुर्ण घोषणा कपिलने केली. माझ्या मृत्यूनंतर माझ्या डोळ्य़ांनी कोणाला नवी दृष्टी मिळत असेल तर माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे.
आपल्या मृत्यूनंतर शरिरीरातील एक छोटासा भागही दान केल्यास त्याचा इतरांना खूप फायदा होतो. तो छोटा भाग त्यांच्या चेहऱ्यावर हसू येण्यास मदत होते. असे शो दरम्यान बोलताना कपिल म्हणाला. अंध क्रिकेटमधिल सदस्यास भेटल्यानंतर कपिल शर्माने हा महत्वपुर्ण आणि धाडसी निर्णय घेतला आहे.
दरम्यान, कपिल शर्माचा गेल्या वर्षी किस किस को प्यार करु हा चित्रपट आला होता. सध्या फिरंगी या चित्रपटामध्ये तो व्यस्त आहे. सोनी टीव्हीवर प्रसारीत होणारा द कपिल शर्मा शो सोबतचं फिरंगी या चित्रपटाच्या शुटींगमध्ये कपिल व्यस्त आहे.