शिवसेना आधी भ्रष्टाचारी नव्हती, आता झाली का? ठाकरेंच्या बाजुने युक्तीवाद करणाऱ्या सिब्बलांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 07:42 PM2023-03-29T19:42:49+5:302023-03-29T19:56:28+5:30

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर विरोधी पक्षांनी देशभरात निदर्शने केली.

kapil sibal dig pm modi on his remark all corrupt on one plateform after amit shah 2023 | शिवसेना आधी भ्रष्टाचारी नव्हती, आता झाली का? ठाकरेंच्या बाजुने युक्तीवाद करणाऱ्या सिब्बलांचा सवाल

शिवसेना आधी भ्रष्टाचारी नव्हती, आता झाली का? ठाकरेंच्या बाजुने युक्तीवाद करणाऱ्या सिब्बलांचा सवाल

googlenewsNext

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर विरोधी पक्षांनी देशभरात निदर्शने केली. यावर देशभरातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, दोन दिवसापूर्वी दिल्लीत विरोधी पक्ष एकत्र येत भाजपविरोधात घोषणा दिल्या. काळे झेंडे दाखवत निषेध केला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.  'सर्व भ्रष्टाचारी एकाच व्यासपीठावर आल्याचे म्हणत टीका केली. यावर आता वकील  कपिल सिब्बल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

जेडीयू आणि शिवसेना हे एकेकाळी भाजपचे मित्र होते पण आता तेही भ्रष्ट झाले आहेत, असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला. 

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ट्विट करुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. 'विरोधक घाबरले आहेत आणि सर्व भ्रष्ट एकाच व्यासपीठावर आले आहेत पण मोदीजी, शिवसेना, अकाली दल, जेडीयू, पीडीपी, बसपा हे सर्व पक्ष तुमचे मित्रपक्ष होते आणि तुम्ही त्यांच्यासोबत सरकार स्थापन बनवले होते आता ती भ्रष्ट झाली आहे पण आधी नव्हती का?', असं ट्विट सिब्बल यांनी केले आहे. 

"मोदी ज्या दिवशी PM राहणार नाहीत, त्यादिवशी भारत भ्रष्टाचार मुक्त होईल; कारण...", केजरीवालांचा हल्लाबोल!

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी काही दिवपसापूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. अमित शहा कर्नाटकातील जाहीर सभेत म्हणाले होते की, राज्यात कुठेही धर्मावर आधारित आरक्षणाची तरतूद नाही. यावर कपिल सिब्बल यांनी ट्विट करून टीका केली, अमित शहा, धर्म आधारित कोटा हे संविधानाचे उल्लंघन आहे, पण धर्मावर आधारित राजकारण, प्रचार, भाषण आणि अजेंडा यावर तुमचे काय म्हणणे आहे? ते संविधानाचे उल्लंघन करत नाही का?, असा सवाल सिब्बल यांनी केला आहे. 

मंगळवारी भाजप मुख्यालयात पक्षाच्या नवीन निवासी संकुलाचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. 'आज तपास यंत्रणा चौकशी केली जात आहे. भ्रष्टाचाऱ्यांची मुळं हादरली आहेत. सर्व भ्रष्टाचारी एकत्र आले आहेत. आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम सुरू केली, तर काही पक्षांनी भ्रष्टाचार वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. घटनात्मक संस्थांवर हल्ले होत असून न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Web Title: kapil sibal dig pm modi on his remark all corrupt on one plateform after amit shah 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.