50 कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या कंपन्यांना करात सूट
By admin | Published: February 1, 2017 12:47 PM2017-02-01T12:47:37+5:302017-02-01T12:47:37+5:30
50 कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या कंपन्यांना आयकरामध्ये 5 टक्के सवलत देण्यात आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - कोटीच्या कोटी स्वरुपात उलाढाल करणा-या कंपन्यांना करामध्ये सूट देऊन मोदी सरकारने दिलासा दिला आहे. 50 कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या कंपन्यांना आयकरामध्ये 5 टक्के सवलत देण्यात आली आहे. 30 टक्क्यांवरुन दर कमी करुन 25 टक्क्यांपर्यंत आणण्यात आला आहे. यामुळे 96 टक्के कंपन्यांना फायदा होणार आहे.
अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे
राजकीय पक्षांना यापुढे चेक आणि डिजीटल माध्यमातून निधी स्वीकारावा लागेल.
राजकीय पक्षांना 2 हजार पेक्षा जास्त निधी रोखीत घेता येणार नाही.
आता 3 लाखा पेक्षा जास्त व्यवहार रोखीने करता येणार नाही. राजकीय पक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे अरुण जेटली यांनी सांगितले.