ग्रामसेवकांनी दाखविली शासकीय आदेशाला केराची टोपली
By admin | Published: June 18, 2015 01:38 PM2015-06-18T13:38:59+5:302015-06-18T13:45:14+5:30
अक्कलकोट : तालुक्यातील ९ ग्रामसेवक व २ ग्रामविकास अधिकार्यांच्या बदल्या होऊन १५ दिवस उलटून गेले तरी अद्याप या ग्रामसेवकांनी पदभार सोडला नाही़ यामुळे शासकीय आदेशाची पायमल्ली होत असून, बदली झालेल्या ग्रामसेवकांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे़
अक्कलकोट : तालुक्यातील ९ ग्रामसेवक व २ ग्रामविकास अधिकार्यांच्या बदल्या होऊन १५ दिवस उलटून गेले तरी अद्याप या ग्रामसेवकांनी पदभार सोडला नाही़ यामुळे शासकीय आदेशाची पायमल्ली होत असून, बदली झालेल्या ग्रामसेवकांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे़
शासनाने सलग सेवेचा कालावधी तपासून एकाच ठिकाणी ८ ते १० वर्षे सेवा झालेल्या ग्रामसेवकांच्या बदल्या केल्या आहेत़ या बदल्या प्रशासकीय अंतर्गत कार्यवाही म्हणून समुपदेशनाने वरिष्ठांच्या आदेशानुसार पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी एस़एम़भालेराव यांनी केल्या़ त्यानंतर शासकीय सेवेचा कालावधी पूर्ण झाल्याने ते सेवानिवृत्त झाले़ त्यानंतर सहायक गटविकास अधिकारी म्हणून वैजिनाथ साबळे यांच्याकडे पदभार मिळाला़ शासनाच्या कोणत्याही विभागातील अधिकारी, कर्मचारी बदली झाल्यानंतर बदली मान्य करत आदेशाच्या ठिकाणी रुजू होणे कमप्राप्त असतानाही संबंधितांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवत न जुमानता पूर्वीच्या ठिकाणीच अद्यापही कार्यरत आहेत़ यास प्रभारी गटविकास अधिकार्यांची मूकसंमती का, अशी चर्चा आहे़
प्रशासकीय समुपदेशनाने बदली झालेले असे़़़़
ग्रामविकास अधिकारी सी़एल़थोरात, पी़आऱतोरस्कर तर ग्रामसेवक आऱए़मियाँवाले, एस़के़ कलशेी, व्ही़बी़वाले, एल़एस़अंधारे, एस़एसग़ायकवाड, वाय़ए़जमादार, एस़पी़घुगरे, आऱव्ही़ बिराजदार, आऱएम़बिराजदार अशा ११ जणांची बदली झाली आहे़ शासकीय आदेशाची पायमल्ली करीत न जुमानता आहे त्याच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत़
कोट़़़़़़़़़़
संबंधितांना वेळोवेळी शासकीय आदेश मानून रुजू होण्यास सांगितले आहे़ तरीही कोणी ऐकत नसल्यास कार्यवाही करून तत्काळ नवीन ठिकाणी रुजू होण्यास भाग पाडू़
-वैजिनाथ साबळे
प्रभारी गटविकास अधिकारी