कारेगाव ग्रामपंचायतीत सत्तांतर विकासाचा मुद्दा ठरला कळीचा

By admin | Published: August 7, 2015 09:35 PM2015-08-07T21:35:33+5:302015-08-07T21:35:33+5:30

शिरूर : पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्यालगत असलेल्या वार्षिक दोन कोटी रुपयांचा महसूल असणार्‍या कोट्यधीश कारेगाव ग्रामपंचायतीमध्ये .... वर्षांनी सत्तापरिवर्तन झाले. महसूल वाढला, मात्र गावात अपेक्षित सोयी-सुविधा सत्ताधार्‍यांना उपलब्ध करून देता आल्या नाहीत. थोडक्यात विकास झाला नाही, या मुद्यावर विरोधकांनी निवडणूक लढवली आणि त्यात यशस्वीही झाले.

Karegaon gram panchayat became the issue of post-independence development | कारेगाव ग्रामपंचायतीत सत्तांतर विकासाचा मुद्दा ठरला कळीचा

कारेगाव ग्रामपंचायतीत सत्तांतर विकासाचा मुद्दा ठरला कळीचा

Next
रूर : पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्यालगत असलेल्या वार्षिक दोन कोटी रुपयांचा महसूल असणार्‍या कोट्यधीश कारेगाव ग्रामपंचायतीमध्ये .... वर्षांनी सत्तापरिवर्तन झाले. महसूल वाढला, मात्र गावात अपेक्षित सोयी-सुविधा सत्ताधार्‍यांना उपलब्ध करून देता आल्या नाहीत. थोडक्यात विकास झाला नाही, या मुद्यावर विरोधकांनी निवडणूक लढवली आणि त्यात यशस्वीही झाले.
पुणे-अहमदनगर रस्त्यावर असलेल्या कारेगावला पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे महत्त्व प्राप्त झाले. या गावाची रेकॉर्डनुसार लोकसंख्या पाच हजार असली तरी मोठ्या प्रमाणावर कामगारवर्ग येथे वसल्याने जवळपास २५ हजारांवर लोकसंख्या या गावात आहे. गावाच्या हद्दीत येणार्‍या कारखान्यांकडून मिळणार्‍या करामुळे गावाचे वार्षिक महसूल दोन कोटींवर गेले. या गावात गेल्या ... वर्षांपासून विश्वास --- व त्यांच्या सहकार्‍यांची सत्ता होती; १० वर्षांत यांच्याकडून अपेक्षित विकास झाला नाही, या मुद्यावर शंकर नवले व नाथा शेवाळे व दोघांचे सहकारी यांनी सत्ताधार्‍यांविरोधात पॅनल उभा केले. निकालही त्यांच्या बाजूने लागला.
शेवाळे यांना विजयाबाबत छेडले असता, ते म्हणाले, तालुक्यातील मोठे महसुली गाव असतानाही सत्ताधार्‍यांना अपेक्षित विकास करता आला नाही. आरोग्य, पाणी, रस्ते, वीज, शिक्षण आदींबाबत प्रश्न आहेत. झपाट्याने वाढणार्‍या गावात दहावीनंतर शिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही, चांगली व्यायामशाळा नाही, वाचनालय नाही, रस्त्याच्या कडेला बसशेड नाही, महिलांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. २५ हजारांवर लोकसंख्या मात्र गरज असताना ग्रामीण रुग्णालयही येथे नाही. दारात औद्योगिक वसाहत मात्र स्थानिकांना तेथे प्राधान्य नाही. यासाठी सत्ताधार्‍यांनी कधी प्रयत्न केले नाहीत. वाढत्या लोकसंख्येमुळे, वाढणार्‍या लोंढ्यामुळे रस्त्यावर होणारी गर्दी, वाहनांचा ताफा यासाठी साधी पार्किंग सुविधाही सत्ताधार्‍यांना उपलब्ध करून देता आली नाही. फक्त इमारती वाढल्या म्हणून विकास होत नसतो. पायाभूत सुविधा तसेच त्याला संलग्न इतरही सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
सत्तापरिवर्तन झाले खरे, मात्र नवीन कारभार्‍यांना दिलेली विजयाची वचने पूर्ण करण्याचे आव्हान असणार आहे. औद्योगिक वसाहतीमुळे नागरीकरण झपाट्याने वाढते आहे. याला ध्यानात घेऊन विकासाचा आराखडा तयार करणे गरजेचे आहे.
हे गाव पुणे-अहमदनगर या महामार्गावर आहे. या गावांतून वाहने जाताना मात्र मोठी कसरत करावी लागते. प्रचंड मोठा लोंढा नेहमीच या रस्त्यावर असतो. वाहने कशाही प्रकारे लावली जातात. याचे नियोजन ग्रामपंचायतीने करणे गरजेचे आहे.
०००००

Web Title: Karegaon gram panchayat became the issue of post-independence development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.