कारगिलचा पारा शून्याखाली २0 पर्यंत, तलाव गोठले; अन्यत्रही तापमान खूपच खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 02:07 AM2018-01-04T02:07:06+5:302018-01-04T02:07:44+5:30
जम्मू आणि काश्मीरच्या लडाख विभागातील कारगिल गावात या हिवाळ््यातील सगळ््यात कडाक्याच्या थंडीची रात्र मंगळवारची ठरली. तेथे पारा गोठणबिंदुच्या खाली २० अंशावर पारा घसरला होता.
श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या लडाख विभागातील कारगिल गावात या हिवाळ््यातील सगळ््यात कडाक्याच्या थंडीची रात्र मंगळवारची ठरली. तेथे पारा गोठणबिंदुच्या खाली २० अंशावर पारा घसरला होता. खोºयात इतरत्र शून्याच्या खाली तापमान नोंद झाले.
कारगिल गावातील किमान तापमान सोमवारच्या रात्री उणे ६.१ अंश सेल्सियस होते ते दुसºया दिवशीच्या रात्री थेट १४ अंशांनी आणखी खाली येऊन २०.६ अंश सेल्सियस नोंदले गेले, असे हवामान खात्याने येथे सांगितले.
त्या भागात बर्फवृष्टी होत नसली तरी सर्व तलाव गोठले आहे. एवढेच नव्हे, तर नळांतून पाणीही येईनासे झाले आहे. घरात साठवून
ठेवलेले पाणीही गोठत असून, त्यामुळे लोकांना स्वयंपाक करणेही अवघड झाले आहे.
कारगिल जवळच्या लेह गावातही किमान तापमान मंगळवारी रात्री उणे १६.६ अंश सेल्सियस नोंद झाले. त्याच्या आदल्या रात्री ते १४.७ अंश सेल्सियस होते. लेहचे मंगळवारी रात्रीचे तापमान या हिवाळ््यातील सर्वात कमी होते. श्रीनगरमध्ये मंगळवारी तापमान उणे ४.१ अंश सेल्सियस एवढे होते. ते त्या आधीच्या रात्री ४.३ अंश सेल्सियस होते. (वृत्तसंस्था)
रोज रात्री बर्फाचा थर
अधिका-याने सांगितले की दक्षिण काश्मीरमधील काझीगुंड येथे तापमान उणे ४ अंश सेल्सियस तर जवळच्या कोकेरनाग गावात तापमान उणे १.७ अंश सेल्सियस नोंद झाले. ते आदल्या रात्री उणे ३.४ अंश सेल्सियस होते. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा गावात मंगळवारच्या रात्री तापमान उणे ३.८ अंश सेल्सियस होते. काश्मीर खोºयात थंडीची लाट तीव्र केली आहे तर पाण्याच्या अनेक ठिकाणच्या साठ्यांवर प्रत्येक रात्री बर्फाचा थर तयार होतो आहे.