Kargil Vijay Diwas : कारगिलचे युद्ध ८४ दिवसांत जिंकले, पण पेन्शनसाठी लढावी लागली १९ वर्षे लढाई,जवानाने मांडली व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 03:40 PM2020-07-26T15:40:20+5:302020-07-26T16:21:36+5:30
सरकारी लोक हुतात्म्यांच्या मंचावर जाऊन पुष्पहार अर्पण करून देशातील लोकांची मनं जिंकतात. मात्र त्यांच्या मनात सैनिकांसाठी कुठल्याही प्रकारचा आदर सन्मान नाही.
नवी दिल्ली - कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाला आज २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. या युद्धात भारताच्या वीर जवानांनी पराक्रमाची शर्थ करून पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांनी केलेले आक्रमण परतवून लावले होते. दरम्यान, कारगिलच्या युद्धात सर्वात दुर्गम असलेल्या टोलोलिंग पर्वतावर कब्जा करणाऱ्या २ राष्ट्रीय राजपुताना रायफल्सच्या तुकडीमध्ये सहभागी असलेले माजी सैनिक लान्सनायक सतवीर बाऊजी यांनी आपल्या शौर्याची कथा कारगिल विजयाच्या निमित्ताने सांगितली. मात्र युद्धात जखमी झाल्यानंतर आणि लष्करातून निवृत्त झाल्यानंतर जखमी सैनिकांच्या सरकारने केलेल्या उपेक्षेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले की, सरकारी लोक हुतात्म्यांच्या मंचावर जाऊन पुष्पहार अर्पण करून देशातील लोकांची मनं जिंकतात. मात्र त्यांच्या मनात सैनिकांसाठी कुठल्याही प्रकारचा आदर सन्मान नाही. मलाही माझे निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी १९ वर्षे लढाई लढावी लागली. जेव्हा मी अन्यायाविरोधात आवाज उठवला, आंदोलन केले. संरक्षण मंत्र्यांशी पत्रांच्या माध्यमातून चर्चा झाली तेव्हा कुठे १९ वर्षांनंतर मला निवृत्तीवेतन सुरू झाले, अशा शब्दात त्यांनी आपली व्यथा मांडली. यासंदर्भातील वृत्त आज तकने प्रकाशित केले आहे.
युद्धात जखमी होणाऱ्या सैनिकांच्या सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपेक्षेबाबत बाऊजी यांनी दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले की, जे जवान युद्धात जखमी होऊन वाचतात त्यांना सरकार रडवून रडवून मारते. कारण त्यांचं कुठलंही काम होत नाही. तसेच त्यांच्या मुलाबाळांनाही नोकरी दिली जात नाही. ना त्यांचं घर चालावं म्हणून काही व्यवस्था केली जात.
जे सैनिक युद्धात जखमी होतात ते आपल्या कुटुंबीयांवर ओझे बनतात. त्यांच्या मुलांना ना शिक्षण घेता येत ना नोकरी करता येत. कारण जखमी सैनिक त्यांचा आश्रित होऊन जातो. आम्हाला प्रत्येक गोष्टीपासून वंचित ठेवला जातो.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
धक्कादायक! कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी ५० हून अधिक मुलांना पाजली देशी दारू
नवीन नोकरी शोधताय? मग अजिबात करू नका या चुका, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान