कर्मयोगी मोठे भाऊ अशोक जैन : शेतकरी आणि सर्वसामान्यांना मानला परिवार
By admin | Published: February 27, 2016 12:22 AM2016-02-27T00:22:27+5:302016-02-27T00:22:27+5:30
परिवार या शब्दाची व्याख्या मोठे भाऊ यांच्या दृष्टीने केवळ आमच्या परिवारापुरती मर्यादित नव्हती. आमचे कुटुंब, जैन इरिगेशन कंपनीतील सहकारी, शेतकरी तसेच सर्वसामान्यांना ते परिवार मानत होते. कोट्यावधी लोकांमधून एखादे व्यक्तिमत्त्व हे मोठ्या भाऊंसारखे निर्माण होत असते. वर्षानुवर्षांचा कालखंड गेल्यानंतर असे माणसे तयार होत असतात. त्यांच्या निधनाने ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही. मोठ्या भाऊंनी छोटा, मोठा, गरीब, श्रीमंत असा कधी भेद केला नाही. या सर्वांच्या दृष्टीने मोठे भाऊ म्हणजे जमिनीवरचा माणूस आहे. जैन हिल्स् या भूमीला उभी करण्यासाठी त्यांनी २५ वर्षांपेक्षा जास्त कालखंड मेहनत घेतली. या ठिकाणी त्यांच्या हाताने लावण्यात आलेल्या वृक्ष व पशूपक्षांशी त्यांचा संवाद होता. या भूमीबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा होता. त्यांच्या अंतिम इच्छेबाबत त्यांनी आज नाही त्
Next
प िवार या शब्दाची व्याख्या मोठे भाऊ यांच्या दृष्टीने केवळ आमच्या परिवारापुरती मर्यादित नव्हती. आमचे कुटुंब, जैन इरिगेशन कंपनीतील सहकारी, शेतकरी तसेच सर्वसामान्यांना ते परिवार मानत होते. कोट्यावधी लोकांमधून एखादे व्यक्तिमत्त्व हे मोठ्या भाऊंसारखे निर्माण होत असते. वर्षानुवर्षांचा कालखंड गेल्यानंतर असे माणसे तयार होत असतात. त्यांच्या निधनाने ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही. मोठ्या भाऊंनी छोटा, मोठा, गरीब, श्रीमंत असा कधी भेद केला नाही. या सर्वांच्या दृष्टीने मोठे भाऊ म्हणजे जमिनीवरचा माणूस आहे. जैन हिल्स् या भूमीला उभी करण्यासाठी त्यांनी २५ वर्षांपेक्षा जास्त कालखंड मेहनत घेतली. या ठिकाणी त्यांच्या हाताने लावण्यात आलेल्या वृक्ष व पशूपक्षांशी त्यांचा संवाद होता. या भूमीबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा होता. त्यांच्या अंतिम इच्छेबाबत त्यांनी आज नाही तर अनेक वर्षांपूर्वी सांगितले होते. १९९४ मध्ये त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी त्यांनी शस्त्रक्रियेनंतर आपले काय होणार याची शाश्वती नाही. मात्र जेव्हा केव्हा या देहाचा त्याग करील, त्यावेळी आपले अंत्यसंस्कार जैन हिल्स्च्या भूमीत व्हावे ही त्यांची अंतिम इच्छा होती. वर्क इज लाईफ ॲण्ड लाईफ इज वर्क या विचारानुसार सर्वसामान्यांसारखे जीवन जगणारे मोठे भाऊ हे कर्मयोगी होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबिय, जैन इरिगेशन कंपनीतील कर्मचारी, विविध समाजाचे आणि धर्माचे लोक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.