Karnal Farmers Protest: “इथं कुणीही आला तरी सरळ डोकं फोडा”; शेतकरी आंदोलनाआधीचा खळबळजनक Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 09:34 PM2021-08-28T21:34:52+5:302021-08-28T21:35:22+5:30
हरियाणातील करनालमध्ये मुख्यमंत्री खट्टर आणि भाजपाच्या आमदार, खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकावरून मागील १० महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. परंतु भाजपाशासित हरियाणा राज्यात शेतकरी आणि पोलीस यांच्यात मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरू होता. आता याठिकाणी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज आणि अटक करण्याचा आरोप पोलिसांवर लावण्यात आला आहे. त्यातच हरियाणातील करनालमधील एक व्हिडीओ समोर आला आहे.
सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवरुन नेटीझन्सनं संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. ज्यात करनालचे उपन्यायदंडाधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांना आंदोलकांची डोकी फोडा असे आदेश देताना दिसत आहेत. एसडीएम आयुष सिन्हा यांच्या व्हिडीओनंतर सोशल मीडियात आंदोलक शेतकऱ्यांचे रक्तबंबाळ झालेले अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. पोलिसांच्या लाठीचार्जचा व्हिडीओही शेअर केला जात आहे.
दिल्लीतील आम आदमी पार्टीचे आमदार नरेश बालियान यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच उपन्यायदंडाधिकारी पोलिसांना म्हणताना दिसतात की, सरळ गोष्ट आहे याठिकाणाहून कुणीही पुढे जाणार नाही, मी स्पष्ट सांगतो, डोकं फोडा, मी डेप्युटी मॅजिस्ट्रेट आहे, मी लिखित सांगतो की, सरळ काठी डोक्यात मारा, काही शंका? उचलून मारा, कोणत्याही आदेशाची वाट पाहू नका. आपण दोन दिवसांपासून इथं ड्युटी करतोय. येथून कुणीही पुढे जायला नाही पाहिजे. जर गेलाच तर त्याचं डोकं फुटायला हवं असं व्हिडीओत म्हणताना दिसत आहे.
आज करनाल में CM खट्टर व भाजपा के सभी MP,MLA की कोई बैठक है, किसानों के डर से करनाल सील है।
— MLA Naresh Balyan (@AAPNareshBalyan) August 28, 2021
ये ड्युटी मजिस्ट्रेट कह रहे हैं कि यहां कोई नहीं आना चाहिए उठा उठा कर मारना, सिर फोड़ देना, पूरी छूट है। ऐसा क्यों?
आख़िर इतनी दरिंदगी तो अंग्रेजो ने भी अपने लोगो के साथ नही किया होगा। pic.twitter.com/W3YYxTyaPy
भाजपा नेत्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन
हरियाणातील करनालमध्ये मुख्यमंत्री खट्टर आणि भाजपाच्या आमदार, खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. भाजपाविरोधात काही शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. डेप्युटी मॅजिस्ट्रेटच्या आदेशानंतर जेव्हा शेतकरी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांची डोकी फुटली, रक्त वाहिलं. जखमी शेतकऱ्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
#WATCH | Haryana: Police baton charged farmers who were protesting at Bastara toll plaza area in Karnal pic.twitter.com/NlYiUnDJMr
— ANI (@ANI) August 28, 2021
आयुष सिन्हा यांचा बचावात्मक पवित्रा
सोशल मीडियात व्हायरल व्हिडीओनंतर आयएएस अधिकारी आयुष सिन्हा यांना विचारण्यात आले असता त्यांनी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दगडफेक सुरु केली होती. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा बळाचा वापर करावा असं कर्मचाऱ्यांना सांगितले होते.