Karnatak News: धक्कादायक! कर्ज न दिल्यामुळे संतापलेल्या व्यक्तीने बँकेला लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 11:47 AM2022-01-11T11:47:02+5:302022-01-11T11:48:44+5:30
कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात रविवारी ही घटना घडली, याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
हावेरी: छोट्या-छोट्या गोष्टींवरचा राग मोठ्या नुकसानाचे कारण बनतो. कर्नाटकात अशाच प्रकारची घटना घडली आहे. बँकेने कर्ज देण्यास नकार दिल्यामुळे संतापलेल्या व्यक्तीने चक्क बँकेलाआग लागवल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली असून, त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Karnataka: Upset over rejection of his loan application, a man allegedly set the bank on fire in Haveri district on Sunday
— ANI (@ANI) January 10, 2022
"The accused has been arrested and a case has been registered at Kaginelli police station under Sections 436, 477, 435 of IPC," say police pic.twitter.com/jrlHOYhegS
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात रविवारी ही घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून कागिनेली पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 436, 477, 435 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अद्याप आरोपीची ओळख जाहीर केलेली नाही.
आरोपीची चौकशी सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला बँकेतून कर्ज घ्यायचे होते, त्यासाठी त्याने बँकेत अर्ज केला होता. मात्र, बँकेने कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्याचा कर्ज अर्ज फेटाळला. यानंतर संतापलेल्या व्यक्तीने बँकेत आग लावली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. पोलिस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.