Karnataka Assembly Election 2018- ...तर मी काँग्रेसला पाठिंबा देईन- एच. डी. देवेगौडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 09:40 AM2018-04-24T09:40:52+5:302018-04-24T09:40:52+5:30

कर्नाटकात विधानसभा 2019च्या निवडणुकीच्या प्रचारात जोरदार कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो आहे.

Karnataka Assembly Election 2018- ... I will support Congress: H. D. Deve Gowda | Karnataka Assembly Election 2018- ...तर मी काँग्रेसला पाठिंबा देईन- एच. डी. देवेगौडा 

Karnataka Assembly Election 2018- ...तर मी काँग्रेसला पाठिंबा देईन- एच. डी. देवेगौडा 

Next

बंगळुरू- कर्नाटकात विधानसभा 2018च्या निवडणुकीच्या प्रचारात जोरदार कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो आहे.  सत्ताधारी काँग्रेसनं सभांचा धडाका लावलेला असून, राहुल गांधी स्वतः प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. तर दुसरीकडे भाजपाकडून अमित शाहा प्रचारात सक्रिय झालेत. परंतु या विधानसभेचा कौल त्रिशंकू येण्याचा अंदाज वर्तवला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर एच. डी. देवेगौडा यांनी पाठिंब्याबाबत सूचक विधान केलं आहे.

कर्नाटकात त्रिशंकू परिस्थिती उद्भवल्यास आम्ही काँग्रेससोबत जाऊ, असंही देवेगौडा म्हणाले आहेत. तसेच त्यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. कर्नाटकाला भाजपाच्या सत्ताकाळात प्रचंड अडचणींना सामना करावा लागला. 5 वर्षांत भाजपानं तीन मुख्यमंत्री  बदलले. हे कर्नाटकासाठी भाजपाचं योगदान आहे. परंतु पाच वर्षांत काँग्रेसनं एकच मुख्यमंत्री ठेवला. त्यांनी सरकारी नोकरदारांसाठी काय केलं पाहा. मी काँग्रेसला महापालिका निवडणुकीत पाठिंबा दिल्यानं माझ्यावर टीकाही करण्यात आली.



मी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर काँग्रेसला पाठिंबा दिला. भाजपाही पाठिंब्यासाठी माझ्या दारी आली होती. परंतु मी त्यांना नाही सांगितलं. काँग्रेसला पाठिंबा देऊनही आमची भूमिका काय ?, राजकारणातल्या पहिल्या दिवसापासून मी धर्मनिरपेक्षतेच्या बाजूनं उभा राहिलो असून, कधीही भावनिक राजकारण केलं नाही. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो, तेव्हा डीजी रामालिंगम यांना विचारणा केली होती की, पोलीस विभागात मुस्लिम हवालदार किती आहेत, तेव्हा त्यांनी फक्त 0.01 टक्के, असं उत्तर दिलं. माणुसकीमुळेच मला आरक्षण मिळालं आहे, असंही देवेगौडा म्हणाले आहेत.

जुन्या म्हैसूर भागात जनता दला(एस)चा मोठा प्रभाव आहे. काँग्रेस आणि जनता दल(सेक्युलर)मध्ये जवळपास 75 विधानसभांच्या जागांवर सरळ सरळ लढत आहे. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. म्हैसूर, हसन, मंड्या, टुमकूर आणि बंगळुरूतल्या बाहेरच्या भागातही कुमारस्वामी यांनी मोठ्या प्रमाणात रॅली घेतल्या आहेत. त्यामुळे कुमारस्वामी पुन्हा सत्ता मिळवतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Web Title: Karnataka Assembly Election 2018- ... I will support Congress: H. D. Deve Gowda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.