Karnataka Elections 2023: 'काँग्रेसवाल्यांनो तुमची बुद्धी संपली, मोदीजींना जेवढे शिव्या द्याल, तेवढे कमळ फुलणार: अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 04:31 PM2023-04-28T16:31:11+5:302023-04-28T16:32:36+5:30

कर्नाटकात विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा जोरदार सुरू आहेत.

karnataka assembly election 2023 amit shah attacks on congress at navalgund assembly constituency | Karnataka Elections 2023: 'काँग्रेसवाल्यांनो तुमची बुद्धी संपली, मोदीजींना जेवढे शिव्या द्याल, तेवढे कमळ फुलणार: अमित शाह

Karnataka Elections 2023: 'काँग्रेसवाल्यांनो तुमची बुद्धी संपली, मोदीजींना जेवढे शिव्या द्याल, तेवढे कमळ फुलणार: अमित शाह

googlenewsNext

कर्नाटकात विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा जोरदार सुरू आहेत. भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, काल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. या टीकेला आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. धारवाडच्या नवलगुंड विधानसभेत जाहीर सभेला संबोधित करताना अमित शहा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. शाह म्हणाले, "काँग्रेस अध्यक्ष खरगे मोदीजींची तुलना काळ्या सापाशी करतात, कधी हे काँग्रेसवाले म्हणतात की मोदी तुमची कबर खोदतील, सोनिया गांधी म्हणतात मृत्यूचे व्यापारी, प्रियंका गांधी म्हणतात खालच्या जातीचे लोक. काँग्रेसवाल्यांची बुद्धी संपली आहे, ते मोदीजींना जेवढे शिव्या घालतील, तेवढे कमळ फुलणार आहे.

गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “काँग्रेस ७० वर्षांपासून कलम ३७० आपल्या मांडीवर बाळाप्रमाणे ठेवत होती. काँग्रेस, जेडीएस, सपा, बसपा, ममता सगळे म्हणायचे की काढू नका, काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील. कलम ३७० हटवले, रक्ताच्या नद्या सोडा, गारगोटीही फेकण्याची हिंमत कोणी दाखवली नाही.

Karnataka Elections 2023:आधी खर्गेंची पीएम मोदींवर टीका; आता भाजप नेत्याचे सोनिया गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य

शाह पुढे म्हणाले, “काँग्रेसने माझ्याविरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल केला आहे. पीएफआयवर बंदी घालून आम्ही कर्नाटक सुरक्षित केले आहे. मी घाबरत नाही. तुमचा काही आक्षेप असेल तर या आणि PFI का चालू ठेवायचे ते सांगा. व्होट बँकेच्या लालसेपोटी काँग्रेसने पीएफआयला डोक्यावर घेतले होते.

शाह म्हणाले, एकीकडे राहुलबाबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आहे तर दुसरीकडे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखालील दुहेरी इंजिन सरकार कर्नाटकला पुढील पाच वर्षांसाठी पुढे नेणार की काँग्रेस सरकार कर्नाटकला मागास नेणार हे ठरवण्याची ही निवडणूक आहे.

Web Title: karnataka assembly election 2023 amit shah attacks on congress at navalgund assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.