Karnataka Assembly Election: बंडानंतर भाजपची ताकद पणाला, मोदी, शाहांसह बडे नेते मोर्चा सांभाळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 09:27 AM2023-04-19T09:27:49+5:302023-04-19T09:28:32+5:30

Karnataka Assembly Election: माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार व माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बंडखोरीचा सामना करणाऱ्या भाजपने राज्यात आता सत्ता वाचविण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

Karnataka Assembly Election: After the rebellion, BJP's strength will be tested, big leaders including Modi, Shah will lead the march | Karnataka Assembly Election: बंडानंतर भाजपची ताकद पणाला, मोदी, शाहांसह बडे नेते मोर्चा सांभाळणार

Karnataka Assembly Election: बंडानंतर भाजपची ताकद पणाला, मोदी, शाहांसह बडे नेते मोर्चा सांभाळणार

googlenewsNext

- संजय शर्मा
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार व माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बंडखोरीचा सामना करणाऱ्या भाजपने राज्यात आता सत्ता वाचविण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

कर्नाटकमध्ये १० मे रोजी मतदान होणार असून, पुढील २० दिवसांत भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावण्याची योजना तयार केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांच्या समवेत सोमवारी बैठक घेतली. यात राष्ट्रीय सरचिटणीसांनी आपापल्या राज्यांतील निवडणूक व्यवस्थापनातील अनुभवी नेते व कार्यकर्त्यांसह कर्नाटकातच निवडणुकीचे मैदान सांभाळावे, असे निर्देश दिले आहेत.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना महाराष्ट्र व त्यांच्याकडे प्रभार असलेले राज्य बिहारमधून नेते व कार्यकर्त्यांची  फौज घेऊन कर्नाटकच्या काही जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अशाच प्रकारे कैलाश विजयवर्गीय यांना मध्य प्रदेशातून, सुनील बंसल यांना उत्तर प्रदेश व राजस्थानच्या नेत्यांना, तरुण चुग यांना भाजप युवा मोर्चाच्या नेत्यांना घेऊन कर्नाटकात जाण्यास सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी व बी. एल. संतोष आधीपासूनच कर्नाटकात तळ ठोकून आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आजच कर्नाटकाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर राज्यात दाखल झालेले आहेत. 

पंतप्रधान माेदी आणि गृहमंत्री शाह यांच्या सभा
गृहमंत्री अमित शाह २० एप्रिलपासून तीन दिवसीय निवडणूक दौऱ्यावर जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ एप्रिल रोजी राज्यात जाहीर सभेला संबोधित करतील. कर्नाटकात मोदी यांच्या १२ पेक्षा अधिक निवडणूक सभा घेण्याचे आजवर नियोजन करण्यात आले आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवसांत ७ किंवा ८ मे रोजी मोदी यांचा बंगळुरूमध्ये रोड शो करण्यात येणार आहे. 

येदीयुरप्पांच्या सभा
माजी मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांनी कर्नाटकमध्ये सर्वांत जास्त निवडणूक दौरा केला आहे. येदीयुरप्पा यांच्या विधानसभेच्या २२४ मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेण्याची योजना तयार करण्यात आली आहे. 

Web Title: Karnataka Assembly Election: After the rebellion, BJP's strength will be tested, big leaders including Modi, Shah will lead the march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.