कुणीही येऊ दे, पण आम्हाला पाणी मिळू दे...; कर्नाटकमधील निम्म्यापेक्षा अधिक मतदार पाण्याला महाग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 08:19 AM2023-05-06T08:19:42+5:302023-05-06T08:20:07+5:30
उत्तर आणि पूर्व कर्नाटकातील विजयपूर, कलबुर्गी, बिदर, यादगीर, रायचूर, कोप्पळ जिल्ह्यांतील खेड्यांत मेमधील रणरणत्या उन्हात डोक्या-कडेवर हंडे-कळशा घेतलेल्या बाया-बापड्या दिसतात.
श्रीनिवास नागे
बागलकोट (कर्नाटक) : ‘यारेss बरली, नमगे नीरू सिगली’ अर्थात ‘कुणीही येऊ दे, पण आम्हाला पाणी मिळू दे...’ डोक्यावर आणि कडेवर पाण्याचे हंडे घेऊन जाणारी कावेरी सांगते, तेव्हा कर्नाटकातील पाणीटंचाईची भीषणता जाणवते. रोजगार, नोकरीची मागणीही तरुण करताना दिसतात.
उत्तर आणि पूर्व कर्नाटकातील विजयपूर, कलबुर्गी, बिदर, यादगीर, रायचूर, कोप्पळ जिल्ह्यांतील खेड्यांत मेमधील रणरणत्या उन्हात डोक्या-कडेवर हंडे-कळशा घेतलेल्या बाया-बापड्या दिसतात. रायचूर जिल्ह्यातल्या देवदुर्गजवळ असा घोळका दिसला. त्यातील १९ वर्षांची कावेरी राजकीय पक्षांबद्दलची अनास्था आणि पाण्याची आस दाखवत म्हणाली, ‘निवडून कुणीही येऊ दे, पण आम्हाला पाणी मिळू दे!’
साड्या, धोती-पंचांचा खप तिपटीवर
निवडणूक ऐन भरात असताना साड्या आणि धोती-पंचे, पांढऱ्या शर्टांचा खप तिपटीवर गेला आहे. काही जागी मोबाइलचा खपही वाढला आहे. सर्वच पक्षांकडून वाटप सुरू आहे. म्हैसूर सिल्क, इरकल अशा महागड्या साड्यांनाही मागणी असल्याचे बागलकोटमधील विक्रेते रमेश मुद्देकर यांनी सांगितले.
पूर्व भागही तहानलेला
विजयपूर-निपाणी, विजयपूर-कलबुर्गी या नव्या हायवेवरून आत गेले की हेच चित्र. अलमट्टी धरण असलेला विजयपूर जिल्हा निम्मा तहानलेला. कर्नाटकचा पूर्वभाग खडकाळ. येथील पाणी जड. चूळ भरायलाही तोंडात धरवत नाही. मतदारांना निवडून येणाऱ्यांकडून एकच अपेक्षा, पाण्याची