Karnataka Assembly Election: मोदींचा चेहराही निष्प्रभ, या पाच कारणांमुळे कर्नाटकात भाजपाचा झाला दारुण पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 03:44 PM2023-05-13T15:44:05+5:302023-05-13T15:44:55+5:30

Karnataka Assembly Election Result 2023: दारुण पराभवाबरोबरच भाजपाच्या जागांमध्ये लक्षणीय अशी घट झाली आहे. भाजपाच्या कर्नाटकमधील पराभवामध्ये पाच कारणं निर्णायक मानली जात आहेत. ती पुढील प्रमाणे आहेत.

Karnataka Assembly Election: Modi's face is also ineffectual, due to these five reasons, BJP suffered a heavy defeat in Karnataka | Karnataka Assembly Election: मोदींचा चेहराही निष्प्रभ, या पाच कारणांमुळे कर्नाटकात भाजपाचा झाला दारुण पराभव

Karnataka Assembly Election: मोदींचा चेहराही निष्प्रभ, या पाच कारणांमुळे कर्नाटकात भाजपाचा झाला दारुण पराभव

googlenewsNext

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये काँग्रेसने १३० हून अधिक जागांवर आघाडी घेतली  असून, त्यांच्याकडे निर्विवाद बहुमत आहे. तर भाजपाच्या जागांमध्ये लक्षणीय अशी घट झाली आहे. भाजपाच्या कर्नाटकमधील पराभवामध्ये पाच कारणं निर्णायक मानली जात आहेत. ती पुढील प्रमाणे आहेत.

नेतृत्व
यातील पहिलं कारण म्हणजे नेतृत्व होय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात भाजपाकडे लोकप्रिय नेतृत्व असलं तरी स्थानिक पातळीवर प्रभावी नेते नसल्याच मोदींच्या नेतृत्वाचा प्रभाव पडत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. कर्नाटकमध्ये प्रभावशाली नेते असलेल्या येडियुरप्पा यांना बाजूला करून बोम्मई यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याचा डाव भाजपावर उलटला. बोम्मई मुख्यमंत्री म्हणून फार प्रभाव पाडू शकले नाहीत. तसेच लक्ष्मण सवदी, जगदीश शेट्टार यांसारख्या नेत्यांना डावलणेही भाजपाला महागात पडले. उलट सिद्धारमैय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्या रूपात काँग्रेसकडे स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्त्व होते त्याचा फायदा काँग्रेसला झाला.

भारत जोडो यात्रा 
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला कर्नाटकमध्ये जबरदस्त प्रतिसाद लाभला होता. या यात्रेने राज्यातील काँग्रेसमध्ये उत्साह निर्माण करण्याचं काम केलं होतं. तसेच या यात्रेमुळे काँग्रेसबाबत जनतेच्या मनात अनुकूल मत तयार होण्यासही मदत झाली आणि त्याचं चित्र निकालामधून दिसलं.

भ्रष्टाचाराचे आरोप
एकीकडे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका घेत असले तरी बोम्मई सरकार भ्रष्टाचारावरून बदनाम झालं होतं. ४० टक्के कमिशनवालं सरकार हा काँग्रेसने लावून धरलेला मुद्दा जनतेला बऱ्यापैकी अपिल झाला. त्यामुळे प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यातच राज्यात भाजपाविरोधी वातावरण निर्माण झाले होते.

हिंदुत्त्वाच्या मुद्द्याचा अतिरेक 
हिंदुत्व हे भाजपासाठी निवडणुकीत जनमत निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे ठरत असले तरी कर्नाटकमध्ये या मुद्द्याचा अतिरेक भाजपावरच उलटल्याचं चित्र आहे. प्रचारात अखेरच्या क्षणी नरेंद्र मोदींनी बजरंग दलाला बजरंगबलीशी जोडणंही मतदारांना तितकंस रुचल्याचं दिसलं नाही. हिंदुत्वाची प्रयोगशाळा मानल्या जाणाऱ्या कोस्टर कर्नाटकमध्येही भाजपाची पीछेहाट झाली. 

लिंगायत दुरावले
कर्नाटकमधील लिंगायत समाज हा सर्वात प्रभावी समजला जातो. दरम्यान, सुरुवातील या समाजातील लोकप्रिय नेते येडियुरप्पा यांना महत्त्व न देणे तसेच जगदीश शेट्टार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला तिकीट न देणे अशा गोष्टींमुळे लिंगायत समाज भाजपापासून दुरावल्याचे दिसून आले. त्याचा मोठा फटका पक्षाला सेंट्रल कर्नाटक आणि मुंबई कर्नाटकमध्ये बसल्याचे दिसून आले.

Web Title: Karnataka Assembly Election: Modi's face is also ineffectual, due to these five reasons, BJP suffered a heavy defeat in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.