Karnataka Assembly Election Result: कर्नाटकमधील कल स्पष्ट होताच संजय राऊतांनी भाजपाला डिवचले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 11:53 AM2023-05-13T11:53:59+5:302023-05-13T11:54:29+5:30
Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील कल स्पष्ट झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपाला डिवचले आहे. कर्नाटकमध्ये तेच होत आहे जे २०२४ मध्ये होणार आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. सध्याच्या कलांमध्ये काँग्रेसने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. तर भाजपाची गाडी ८० जागांच्या आसपास अडखळली आहे निवडणुकीतील कल स्पष्ट झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपाला डिवचले आहे. कर्नाटकमध्ये तेच होत आहे जे २०२४ मध्ये होणार आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, जर कर्नाटकमध्ये काँग्रेस विजयी होत असेल, तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा पराभव आहे. आपला पराभव डोळ्यांसमोर पाहून त्यांनी बजरंगबलीला मैदातान उतरवले. मात्र त्यांची गदा भाजपावरड पडली आहे. कर्नाटकमध्ये तेच होत आहे. जे २०२४ मध्ये होणार आहे, असे भाकितही संजय राऊत यांनी केले.
दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालांत आघाडी मिळाल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आता पक्षामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते सिद्धारामैय्या आणि ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.