Karnataka Election 2018: माझ्या मुलानेच माझी प्रतिमा खराब केली- एच. डी. देवैगोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 12:45 PM2018-04-30T12:45:43+5:302018-04-30T14:47:56+5:30

अनेकवेळा एकमेकांशी मैत्री करणारे, शत्रूत्त्व पत्करणारे कर्नाटकातले नेते आणि राजकीय पक्ष आता भूतकाळातील घटनांबद्दल हिशेब मांडत आहेत.

Karnataka Assembly Elections 2018, my son tarnished my image- H. D. Devagoda | Karnataka Election 2018: माझ्या मुलानेच माझी प्रतिमा खराब केली- एच. डी. देवैगोडा

Karnataka Election 2018: माझ्या मुलानेच माझी प्रतिमा खराब केली- एच. डी. देवैगोडा

Next

बेंगळुरु- कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस राहिले असताना राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं. अनेकवेळा एकमेकांशी मैत्री करणारे, शत्रूत्त्व पत्करणारे कर्नाटकातले नेते आणि राजकीय पक्ष आता भूतकाळातील घटनांबद्दल हिशेब मांडत आहेत. माजी पंतप्रधान देवेगौडा ज्या भाजपाला जातीयवादी ठरवायचे त्याच भाजपाबरोबर 20 महिने कर्नाटकात सत्तेत राहिल्यावर आता त्या निर्णयाबद्दल ते आता बाजू मांडत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी माझा मुलगा (कुमारस्वामी) याने भाजपाबरोबर जाऊन माझी प्रतिमा मलिन केली असे विधान देवेगौडा यांनी केले आहे.

तुमचे सर्वात मोठे शत्रू कोण भाजपा की काँग्रेस ? असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, ''दोन्ही माझे शत्रूपक्षच. दोघेही मला नष्ट करण्याची इच्छा बाळगतात. काँग्रेसने सिद्धरामय्या यांना माझ्याकडून का हिसकावले गेले?  त्यांनी माझ्याकडून एमपी प्रकाशला का पळवले?  काँग्रेसने या लोकांना पळवल्यामुळे माझा मुलगा कुमारस्वामीला भाजपाकडे जावे लागले. त्यामुळे माझी प्रतिमा मलीन झाली. यामध्ये सर्वात त्रास देवगौडा आणि त्यांच्या धर्मनिरपेक्ष पक्षाला झाला. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवण्याचं धाडस काँग्रेसकडे येतंच कोठून? चंद्रशेखर यांना पंतप्रधानपदावरुन का बाजूला केलं? चरणसिंह यांना पंतप्रधापदावर का बसवलं गेलं? हे सगळं काँग्रेसनं का केलं? 1996 साली पंतप्रधान असताना मी गुजरातमधील भाजपाचं सरकार हटवलं होतं. ते माझ्यासमोर काय बोलणार? सहा वर्षे अटलबिहारी वाजपेयी यांच्याबरोबर सत्तेत असणाऱ्या द्रमुकच्या एम. करुणानिधी दारात काँग्रेसवाले गेले. राजीव गांधी यांची हत्य़ा झाली तेव्हा ते (करुणानिधी) मुख्यमंत्री होते, हे सगळं संधीसाधू राजकारण नाही का?''

2019ची निवडणूक लढवणार नाही...
2019 साली आपण निवडणूक लढवणार नसल्याचे सांगताना एच. डी. देवेगौडा म्हणाले,'' मी पुढील वर्षी निवडणूक लढवायचे नसल्याचे ठरवले आहे. काँग्रेस आणि भाजपा नसलेली आघाडी तयार करणे अत्यंत अवघड आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. मी आता एक ज्येष्ठ म्हणून सल्ला देईन पण कोणतीही सक्रीय भूमिका घेणं मला शक्य नाही. माझी तब्येत चांगली नाही आणि जर पूर्ण न्याय देता येत नसेल तोपर्यंत मला कोणतंही पद नको आहे ."

Web Title: Karnataka Assembly Elections 2018, my son tarnished my image- H. D. Devagoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.