मोठी बातमी! विधानसभेचा बिगुल वाजला; कर्नाटकात एकाच दिवशी मतदान, निकालाची तारीखही ठरली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 12:07 PM2023-03-29T12:07:32+5:302023-03-29T12:26:04+5:30
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तातडीने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - देशाचं लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटकविधानसभानिवडणूकांच्या तारखांची घोषणा अखेर झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी आज सकाळी साडेअकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, कर्नाटकमध्ये १० मे रोजी मतदान (Voting) होणार आणि १३ मे रोजी निकाल (Result) लागणार आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तातडीने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
कर्नाटकच्या २२४ विधानसभेच्या जागांसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये, अनुसूचित जातीसाठी ३६ जागांवर आरक्षण आहे, तर अनुसूचित जमातींसाठी १५ जागा राखीव आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी १० मे रोजी मतदान घेण्यात येणार असून १३ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे राज्यात एकाच टप्प्यात मतदान होत आहे. त्यासाठी, अर्ज करण्यासंदर्भातील नोटीफिकेशन १३ एप्रिल रोजी निघणार आहे.
कर्नाटक मध्ये ५८,२८२ मतदान केंद्र असून २०,८६६ शहरी केंद्र आहेत. ज्यामध्ये ५०% मतदान केंद्रांवर म्हणजेच २९,१४० केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येणार आहेत. तर, कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी २४० मतदान केंद्रांना मॉडेल पोलिंग स्टेशन बनवण्यात येत असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
कर्नाटक विधानसभा के लिए मतदान 10 मई को होंगे और मतदान की गणना 13 मई को होगी: भारत के मुख्य चुनाव आयुक्त राजीव कुमार, दिल्ली pic.twitter.com/3HEyvNPNdk
— ANI_HindiNews (@AHindinews) March 29, 2023
करीब 1,320 मतदान केंद्रों पर केवल महिला कर्मचारी मौजूद रहेंगी। इससे हम महिला सशक्तिकरण को भी बढ़ावा दे रहे हैं। हम 240 मतदान केंद्रों को मॉडल पॉलिंग स्टेशन बनाएंगे। युवाओं को मतदान केंद्रों पर लाने के लिए 224 मतदान केंद्र सिर्फ युवाओं द्वारा संचालित किया जाएगा: मुख्य चुनाव आयुक्त… pic.twitter.com/k6KHLjAduQ
— ANI_HindiNews (@AHindinews) March 29, 2023
२४ मे रोजी संपतोय विधानसभेचा कार्यकाळ
यापूर्वीच्या पंचवार्षिक म्हणजेच २०१८ मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम २७ मार्च रोजी जाहीर झाला होता. यंदा आज म्हणजेच २९ मार्च रोजी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. कर्नाटकात १० मे रोजी मतदान होत असून १३ मे २०२३ रोजी निकाल हाती येणार आहेत. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही एकाच टप्प्यात मतदान घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ २४ मे रोजी संपत आहे.
कर्नाटकमधील सध्याचं संख्याबळ
कर्नाटकमध्ये २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. मात्र, भाजपने २२४ जागांपैकी सर्वाधिक १०४ जागा जिंकत वर्चस्व मिळवले होते. तर, काँग्रेसने ८० जागा जिंकल्या होत्या, जेडीएसने ३७ जागा जिंकल्या. मात्र, सुरुवातीला सर्वात मोठा पक्ष असूनही भाजप सत्तेपासून दूर राहिला होता. अखेर, भाजपने बंडखोर आमदारांसोबत एकत्र येत कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन केली, तेव्हा मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा हे होते.