Karnataka Assembly Elections: भाजपची 'बेळगाव'मधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर, आमदार अनिल बेनकेंचा पत्ता कट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 04:27 PM2023-04-12T16:27:46+5:302023-04-12T16:30:57+5:30

बेळगाव : भाजपची बेळगाव जिल्ह्यातील उमेदवार यादी जाहीर झाली असून बेळगाव उत्तर, खानापूर, ग्रामीण, हुक्केरी आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी ...

Karnataka Assembly Elections: List of 18 BJP candidates from Belgaum announced, MLA Anil Benke No candidacy | Karnataka Assembly Elections: भाजपची 'बेळगाव'मधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर, आमदार अनिल बेनकेंचा पत्ता कट

Karnataka Assembly Elections: भाजपची 'बेळगाव'मधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर, आमदार अनिल बेनकेंचा पत्ता कट

googlenewsNext

बेळगाव : भाजपची बेळगाव जिल्ह्यातील उमेदवार यादी जाहीर झाली असून बेळगाव उत्तर, खानापूर, ग्रामीण, हुक्केरी आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले आहेत. या उमेदवार यादीत सर्वाधिक आश्चर्यचकित करणारी गोष्ट घडली असून, विद्यमान आमदार अनिल बेनके यांना डावलून डॉ. रवी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

खानापूर मतदारसंघातून विठ्ठल हलगेकर, दक्षिणमधून अभय पाटील, हुक्केरीमधून निखिल कत्ती, ग्रामीणमधून नागेश मन्नोळकर आणि अथणीमधून महेश कुमठळ्ळी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

बेळगाव उत्तर मतदारसंघात लिंगायत समाजाने अलीकडेच लिंगायत उमेदवार जाहीर केल्यास आपल्या सर्व संघटनांचा पाठिंबा देण्यात येईल, असे जाहीर केले होते. यामुळे हीच बाब हेरून भाजपने उत्तरमध्ये लिंगायत समाजातील डॉ. रवी पाटील यांना संधी दिली आहे, तर कर्नाटकातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी केलेल्या आग्रहामुळे अथणी, कागवाड आणि ग्रामीण मतदारसंघात जारकीहोळी समर्थकांना संधी देण्यात आली आहे. 

ग्रामीणमधून नागेश मन्नोळकर, अथणीमधून महेश कुमठळ्ळी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण मतदारसंघात विद्यमान आमदारांची असलेली पकड लक्षात घेत पुन्हा अभय पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आली असून, खानापूरमध्ये गेल्या वर्षभरात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांची यादी लक्षात घेत विठ्ठल हलगेकर यांना संधी देण्यात आली आहे. 

मात्र, या निवडणुकीत उमेदवारी मिळेल या आशेने भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार अरविंद पाटील यांना मात्र उमेदवारी नाकारली आहे. हुक्केरी मतदारसंघातून दिवंगत मंत्री उमेश कत्ती यांचे पुतणे निखिल कत्ती यांना संधी देण्यात आली असून, भाजपने या मतदारसंघात घराणेशाही जपत उमेदवारी जाहीर केल्याचे निदर्शनात येत आहे. याचबरोबर निपाणी मतदारसंघात शशिकला जोल्ले, चिकोडी मतदारसंघातून रमेश कत्ती यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

अशी आहे बेळगाव जिल्ह्यातील उमेदवारांची यादी

अथणी -महेश कुमटहळ्ळी
निपाणी - शशिकला जोल्ले
चिकोडी - रमेश कत्ती
कागवाड - श्रीमंत पाटील
कुडची - पी राजीव
रायबाग - दुर्योधन ऐहोले
हुक्केरी - निखिल कत्ती
गोकाक - रमेश जारकिहोळी
अरभावी - भालचंद्र जारकिहोळी
यमनकनमर्डी - बसवराज हुंद्री
बेळगाव उत्तर - डॉ. रवी पाटील
बेळगाव दक्षिण - अभय पाटील
बेळगाव ग्रामीण - नागेश मन्नोळकर
खानापूर - विठ्ठल हल्गेकर

Web Title: Karnataka Assembly Elections: List of 18 BJP candidates from Belgaum announced, MLA Anil Benke No candidacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.