Karnataka Assembly Elections - सत्तेच्या हव्यासापोटी किळसवाणे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 03:39 AM2018-05-12T03:39:15+5:302018-05-12T03:39:15+5:30

कर्नाटक हा ‘परमेश्वराचा प्रदेश’ म्हणून ओळखला जातो. पण येथील राजकारण किळसवाणे आहे. या निवडणुकीतील तिकीट वाटपात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे

Karnataka Assembly Elections - Politics of Assertiveness Rebellion of Power | Karnataka Assembly Elections - सत्तेच्या हव्यासापोटी किळसवाणे राजकारण

Karnataka Assembly Elections - सत्तेच्या हव्यासापोटी किळसवाणे राजकारण

Next

राजदीप सरदेसाई
कर्नाटक हा ‘परमेश्वराचा प्रदेश’ म्हणून ओळखला जातो. पण येथील राजकारण किळसवाणे आहे. या निवडणुकीतील तिकीट वाटपात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे येथील जनता राजकारण्यांऐवजी चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या क्रिकेटकडे अधिक आकर्षित होताना दिसते.
मुख्यमंत्रिपदाचे तीन दावेदार आहेत. कर्नाटकला स्थिर सरकार देणारे काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या, भाजपाचे बी.एस. येदीयुरप्पा आणि एच.डी. देवेगौडा यांचे पुत्र एच.डी. कुमारस्वामी. सिद्धरामय्या यांनी चार वर्षे आरामात काढल्यावर अचानक एका मागोमाग एक सवलती द्यायला सुरुवात केली. त्यांची प्रतिमाही उंचावली आहे.
मुख्यमंत्रिपदाचा भाजपचा चेहरा असलेले बी.एस. येदीयुरप्पा यांचे वय ७५ वर्ष असल्याने त्यांना निवृत्त होऊन मार्गदर्शक मंडळात स्थान मिळवायला हवे होते. सत्ता असताना त्यांनी विश्वासार्हता गमावली होती. त्यांना तुरुंगवासही झाला. पण त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार करताना भाजपची हतबलताच स्पष्ट झाली.
तिसरा मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असलेले एच.डी. कुमारस्वामी हे जनता दल (एस)चे उमेदवार आहेत. ते वोकालिंगा समाजाचे असून आपल्या व्यवसायात त्यांनी अनेक राजकारण्यांना भागीदार केलेले आहे. रेड्डींच्या खाण घोटाळ्याने भाजपचे कर्नाटकातील सरकार कोसळले होते. मात्र त्यांनाच पुन्हा भाजपात घेतल्याने मोदींच्या भ्रष्टाचाराविरोधाची पक्षानेच एकप्रकारे खिल्लीच उडविली आहे.
देवभूमीत सत्ता मिळवण्यासाठी नेत्यांनी मठांना आणि मंदिरांच्या पायऱ्या झिजवल्या. स्वामीदर्शनाचा सपाटा लावला. या परिस्थतीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळण्याची स्थिती उद्भवू शकते. त्यादृष्टीने देवेगौडा आणि कुमारस्वामी यांच्या निवासस्थानाबाहेर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. किंगमेकर्सचे महत्त्व वाढले आहे!

Web Title: Karnataka Assembly Elections - Politics of Assertiveness Rebellion of Power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.