कर्नाटकने कावेरीचे पाणी सोडण्याचा निर्णय टाळला
By Admin | Published: September 22, 2016 01:16 AM2016-09-22T01:16:08+5:302016-09-22T01:16:08+5:30
कर्नाटकने कावेरीचे पाणी सोडण्याचा निर्णय टाळला बंगळुरू : तामिळनाडूसाठी कावेरीचे ६,००० क्युसेक पाणी सोडण्याचा निर्णय कर्नाटकने २३ सप्टेंबरपर्यंत टाळला ...
>कर्नाटकने कावेरीचे पाणी सोडण्याचा निर्णय टाळला बंगळुरू : तामिळनाडूसाठी कावेरीचे ६,००० क्युसेक पाणी सोडण्याचा निर्णय कर्नाटकने २३ सप्टेंबरपर्यंत टाळला आहे. बुधवारी रात्री हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात उच्च न्यायालयाच्या निर्देशावर निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, पाणी सोडण्याचा हा निर्णय टाळण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी सर्वपक्षीय बैठकही झाली. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन २३ सप्टेंबर रोजी बोलाविण्यात आले आहे. २७ सप्टेंबरपर्यंत कर्नाटकने ६,००० क्युसेक पाणी सोडावे, असा आदेश न्यायालयाने दिला होता. कावेरीप्रकरणी पर्यवेक्षकीय समितीने १९ रोजी कर्नाटकला सांगितले होते की, त्यांनी २१ ते ३० सप्टेंबरपर्यंत प्रति दिन ३,००० क्युसेक पाणी सोडावे; पण उच्च न्यायालयाने २१ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या काळात तामिळनाडूसाठी ६,००० क्युसेक पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. ............