देशभरात चर्चेत आहे हा 1 कोटी रुपयांचा 'सांड', सीमेनच्या एका डोसची किंमत वाचून व्हाल अवाक...!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 01:18 PM2021-11-15T13:18:06+5:302021-11-15T13:20:11+5:30
या बैलाची किंमत सुमारे एक कोटी रुपये एवढी आहे आणि हा बैल हल्लीकर जातीचा आहे, असे बैलाचे मालक बोरेगौडा यांनी सांगितले.
कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील कृषी मेळाव्यातील एक कोटी रुपयांचा बैल सध्या देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. या मेळाव्यात पोहोचलेल्या लोकांनी या बैलासोबत सेल्फीही काढले. यासंदर्भात बोलताना बैलाच्या मालकाने सांगितले की, या बैलाच्या सीमेना प्रचंड मागणी आहे, आम्ही या बैलाच्या सीमेनचा एक डोस एक हजार रुपयांना विकतो. (Bangalore agriculture fair)
बंगळुरू येथे चार दिवसीय कृषी मेळाव्याचे आयोजित करण्यात आले आहे. यात जवळपासच्या अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आपली जनावरे आणली आहेत. याचवेळी बोरेगौडा यांनीही त्यांचा साडेतीन वर्षांचा एक बैल प्रदर्शनासाठी आणला आहे. त्यांनी सांगितले की, ते या बैलाला कृष्ण नावाने बोलावतात.
या बैलाची किंमत सुमारे एक कोटी रुपये (One crore bull) एवढी आहे आणि हा बैल हल्लीकर जातीचा आहे, असे बैलाचे मालक बोरेगौडा यांनी सांगितले.
बोरेगौडा म्हणाले, या बैलाच्या सीमेनला प्रचंड मागणी आहे. याचा एक डोस तब्बल एक हजार रुपयांना विकला जातो. या मेळाव्यात या बैलाची क्रेझ एवढी आहे, की लोक त्यांच्यासोबत सेल्फी काढत आहेत.