सिद्धरामय्यांच्या मंत्रिमंडळातील 32 पैकी 24 मंत्र्यांवर गुन्हे; 31 कोट्यधीश! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 04:29 PM2023-05-29T16:29:19+5:302023-05-29T16:30:00+5:30

Karnataka ADR Report : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालात ही माहिती समोर आली आहे.

karnataka cabinet adr report 24 out of 32 ministers have criminal cases 31 are crorepatis | सिद्धरामय्यांच्या मंत्रिमंडळातील 32 पैकी 24 मंत्र्यांवर गुन्हे; 31 कोट्यधीश! 

सिद्धरामय्यांच्या मंत्रिमंडळातील 32 पैकी 24 मंत्र्यांवर गुन्हे; 31 कोट्यधीश! 

googlenewsNext

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला असून खात्यांची विभागणीही केली आहे. सिद्धरामय्या मंत्रिमंडळात एकूण 32 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रीही गुन्हेगारी प्रकरणांपासून मुक्त नाहीत. 32 मंत्र्यांपैकी 24 मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालात ही माहिती समोर आली आहे.

रिपोर्टनुसार, 32 मंत्र्यांपैकी 31 कोट्यधीश आहेत, ज्यांची सरासरी संपत्ती जवळपास 119.06 कोटी रुपये आहे. सिद्धरामय्या यांनी आपली संपत्ती 51 कोटी रुपये असल्याचे घोषित केले आहे, तर त्यांच्यावर 23 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहेत. या मंत्र्यांमध्ये सर्वात श्रीमंत उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आहेत, ज्यांनी 1,413.80 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. तसेच, या मंत्र्यांमध्ये सर्वात कमी संपत्ती तिम्मापूर रामाप्पा बाळाप्पा यांच्याकडे आहे, त्यांची संपत्ती फक्त 58.56 लाख रुपये आहे.

याचबरोबर, मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या एकमेव महिला आमदार लक्ष्मी आर हेब्बाळकर याही करोडपती आहेत. त्यांच्याकडे 13 कोटींहून अधिक संपत्ती आहे. त्यांनी 5 कोटींहून अधिक कर्जाची घोषणा केली आहे. कर्जाच्या बाबतीत डीके शिवकुमार पहिल्या क्रमांकावर आहेत. कनकापुरा मतदारसंघातून विजयी झालेल्या शिवकुमार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात 265 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे म्हटले आहे.

8वी ते 12वी पर्यंतचे 6 मंत्र्यांचे शिक्षण
मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या मंत्र्यांमध्ये 6 असे मंत्री आहेत, ज्यांनी 8वी ते 12वी पर्यंतची शैक्षणिक पात्रता जाहीर केली आहे तर 24 मंत्री एकतर पदवीधर किंवा उच्च शैक्षणिक पात्रता असलेले आहेत. दोन मंत्री पदविकाधारक आहेत. सिद्धरामय्या मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या एकूण मंत्र्यांपैकी 18 मंत्र्यांचे वय 41 ते 60 वर्षांच्या दरम्यान आहे. 14 मंत्र्यांचे वय 60 ते 80 दरम्यान आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार व इतर आठ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर शनिवारी आणखी 24 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. 

Web Title: karnataka cabinet adr report 24 out of 32 ministers have criminal cases 31 are crorepatis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.