शाळेत राष्ट्रगीत गाताना 10वीत शिकणाऱ्या मुलीला हृदयविकाराचा झटका; उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 03:55 PM2023-08-09T15:55:29+5:302023-08-09T15:56:55+5:30

या घटनेमुळे शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे.

karnataka-chamarajanagar-class-10-student-dies-of-heart-attack-while-singing-national-anthem | शाळेत राष्ट्रगीत गाताना 10वीत शिकणाऱ्या मुलीला हृदयविकाराचा झटका; उपचारादरम्यान मृत्यू

शाळेत राष्ट्रगीत गाताना 10वीत शिकणाऱ्या मुलीला हृदयविकाराचा झटका; उपचारादरम्यान मृत्यू

googlenewsNext

Heart Attack News: कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका शाळेत सकाळी राष्ट्रगीत म्हणत असताना एका विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुलीला झटका आल्यानंतर शाळेतील लोकांनी तात्काळ तिला रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टर तिचे प्राण वाचवू शकले नाहीत. माहिती मिळताच पोलिसांनी शाळेत पोहोचून घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पेलिशा असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. ती अवघ्या 16 वर्षांची होती आणि दहावीच्या वर्गात शिकत होती. ही घटना चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट येथे घडली. शाळा व्यवस्थापनाने सांगितल्यानुसार, दररोजप्रमाणे बुधवारी सकाळी शाळेत सर्व मुले राष्ट्रगीत म्हणत होते. यादरम्यान पेलिशाला अचानक चक्कर आली. 

यानंतर शिक्षकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी पेलिशाचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र काही वेळातच तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या मते तिला हृदयविकाराचा झटका आला असावा. दुर्दैवी बाब म्हणजे, पेलिशा अनाथ होती आणि निर्मला शाळेच्या वसतिगृहात राहायची. पेलिशाच्या अकाली मृत्यूने शाळेतील शिक्षक व मुलांना मोठा धक्का बसला आहे.

Web Title: karnataka-chamarajanagar-class-10-student-dies-of-heart-attack-while-singing-national-anthem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.