कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सियाचीनला म्हटले चीनचा प्रदेश
By admin | Published: December 22, 2016 06:00 PM2016-12-22T18:00:01+5:302016-12-22T18:00:01+5:30
सोशल मीडियावर एक पोस्ट अपलोड केल्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दारमय्या गुरुवारी संकटात सापडले.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - सोशल मीडियावर एक पोस्ट अपलोड केल्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दारमय्या गुरुवारी संकटात सापडले.
सिद्धरमय्या यांनी फेसबुक आणि ट्विटरवर एक पोस्ट अपलोड केली होती. त्यामध्ये त्यांनी भारतातील सियाचीन हा प्रदेश चीनचा असल्याचे म्हटले. त्यांच्या या पोस्टवर नेटीझन्सनी जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर त्यांनी फेसबुक आणि ट्विटरवरील ही पोस्ट डिलीट केली.
सिद्धरमय्या यांच्या ट्विटमध्ये असे होते की, सियाचीन प्रांतचे मुख्यमंत्री ली जॉन्ग यांच्या अध्यक्ष्यतेखाली चीनच्या प्रतिनिधी मंडळाशी बंगळुरु शहराच्या पायाभूत सुविधा, विकास आणि अन्य क्षेत्रांबाबत चर्चा झाली.
दरम्यान, स्पेलिंगमध्ये चूक झाल्याने चुकून चीनच्या सिचुआनला त्यांनी सियाचीन म्हटले.