Maharashtra Karnataka Border Dispute: “महाराष्ट्रातील विरोधी पक्ष सीमावादाचे राजकारण करतोय, त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेय”
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 11:46 AM2022-12-22T11:46:52+5:302022-12-22T11:50:35+5:30
Maharashtra Karnataka Border Dispute: मुंबई काढण्यात आलेला महामोर्चा राजकीय हेतूने प्रेरित होता, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे.
Maharashtra Karnataka Border Dispute: दिल्लीत सीमाप्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सोबत झालेली बैठक सीमा प्रश्नासाठी नव्हे तर सीमेवरील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी होती असे घुमजाव कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. यानंतर आता महाराष्ट्रातील विरोधी नेत्यांनीही सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्रातील विरोधकांवर टीका केली आहे.
बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यांवर टीका करताना म्हटले आहे की, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी टीका करत, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षांच्या सदस्यांवर सीमारेषेचे राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बोम्मई यांनी केला. ते पत्रकारांशी बोलत होते.
सीमावादातून राजकीय फायदा उठविण्याचा निष्फळ प्रयत्न
हाराष्ट्र राज्य विधानसभेतील विरोधीपक्ष नेत्यांनी सभागृहाच्या आत आणि सभागृहाबाहेर केलेल्या विधानांवरून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे स्पष्ट होते. याआधीच सीमावादातून राजकीय फायदा उठविण्याचा निष्फळ प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. यावेळी ते तसे करण्यात अपयशी ठरले आहेत, अशी टीका बोम्मई यांनी केली. तसेच मुंबई काढण्यात आलेला महामोर्चा राजकीय हेतूने प्रेरित होता, असे बोम्मई यांनी म्हटले आहे. जनतेचा पाठिंबा नसतानाही त्यांनी पक्षाचे झेंडे घेऊन मोर्चा काढला. ज्यात विरोधी पक्षांचे सदस्य आणि त्यांचे पदाधिकारीच सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. तसेच हा मोर्चा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचेही स्पष्टपणे दिसून येते, या शब्दांत बोम्मई यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, ज्या वेळी दोन्ही राज्यातील लोक सौहार्दपूर्ण संबंध ठेवत आहेत, व्यवसाय करत आहेत आणि लोक राज्याराज्यांमध्ये प्रवास करत आहेत, अशा वेळी हे नेते कर्नाटकात मोठ्या प्रमाणात प्रवेश करण्याचा आणि लोकांना उत्तेजित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे नमूद केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"